काबूलमध्ये लष्करी रुग्णालयावर हल्ला; 30 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

काबूलः अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील सर्वांत मोठ्या चारशे खाटांच्या लष्करी रुग्णालयात डॉक्‍टरांच्या वेशात आलेल्या "इसिस'च्या दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात 30 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.

रुग्णालयाच्या इमारतीला लष्कराने वेढा दिला आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमक अद्याप सुरू असून, एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे; तर इतर दोन दहशतवादी अद्यापही रुग्णालयाच्या इमारतीमध्ये दडून बसले असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. चकमकीत एक सैनिक मृत्युमुखी पडला असल्याचेही सांगण्यात आले.

या हल्ल्याची जबाबदारी "इसिस'ने स्वीकारली आहे. या हल्ल्यामध्ये आपला कुठलाही सहभाग नसल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले. डॉक्‍टरांच्या वेशातील दहशतवाद्यांनी लष्कराच्या सरदार दाउद रुग्णालयात प्रवेश करून गोळीबार सुरू केला. त्यानंतर लष्कराचे सैनिक हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून रुग्णालयाच्या इमारतीवर दाखल झाले. या वेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार करण्यात आला असून, इतर दोन जण रुग्णालयाच्या इमारतीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात तीन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून, ही संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक वेळेनुसार आज सकाळी नऊ वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. डॉक्‍टरांच्या वेशातील दहशतवाद्यांनी रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर सुरक्षारक्षकांसह रुग्ण आणि डॉक्‍टरांवर गोळीबार करण्यास सुरवात केली, अशी माहिती रुग्णालयाच्या इमारतीमधून स्वतःची सुटका करण्यात यशस्वी ठरलेल्या एका डॉक्‍टरने दिली. अनेक रुग्णांना आपत्कालीन मार्गाने रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आले असून, त्यांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: gunmen dressed as doctors attack military hospital in Kabul