पोलिसांनाच बसला हॅकर्सचा हिसका

यूएनआय
Monday, 21 September 2020

अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेन्को यांच्या विरोधातील निदर्शनांना शनिवारी रात्री नाट्यमय कलाटणी मिळाली. अज्ञात हॅकर्सनी सुमारे एक हजार पोलिसांचा वैयक्तिक डाटाच हॅक केला. टेलिग्रामच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करण्यात आला.

मिन्स्क (बेलारूस) - अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेन्को यांच्या विरोधातील निदर्शनांना शनिवारी रात्री नाट्यमय कलाटणी मिळाली. अज्ञात हॅकर्सनी सुमारे एक हजार पोलिसांचा वैयक्तिक डाटाच हॅक केला. टेलिग्रामच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ल्युकाशेन्को यांनी अध्यक्षीय निवडणूकीच्या मतमोजणीत गैरप्रकार करून स्वतःला विजयी घोषित केले असा असंख्य नागरिकांचा आरोप आहे. त्यांच्या विरोधातील निदर्शने दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. पोलीस तसेच सुरक्षा संस्थेचे कर्मचारी निदर्शने मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करीत आहेत.

आमचा ओरॅकलबरोबर करार पूर्ण : टिकटॉक

नेक्स्टा लाईव्ह या सरकारच्या विरोधातील वृत्तवाहिनीच्या माध्यमातून एक निवेदन जारी करण्यात आले. त्यानुसार अटक होत असली तरी पोलिसांशी संबंधित माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केली जाईल. चेहरा झाकून घेतला तरीही कुणी यातून बचावणार नाही.

दुसऱ्या लाटेमुळे ब्रिटनमध्ये निर्बंध कडक; स्वयंविलगीकरण टाळल्यास साडेनऊ लाख रुपये दंड

महिलांचा सहभाग लक्षणीय
दरम्यान, ल्युकाशेन्को यांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय आहे. शनिवारी तब्बल ३९० महिलांना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

चष्मेबद्दूर रोखू शकतात कोरोनाच्या संसर्गाला

हॅकिंगला जबाबदार असलेल्यांना सरकार शोधून काढेल आणि कारवाई करेल. सुरक्षा संस्थांकडे असलेले दल, माध्यमे आणि तंत्रज्ञान पाहता तसी क्षमता आहे.
- ओल्गा चेमोडॅनोवा, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hackers snatch the police