esakal | धक्कादायक! हैतीच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Jovenel Moise

हैतीचे अध्यक्ष जोवेनेल मोईस (Jovenel Moïse) यांची त्यांच्या घरात शिरुन हत्या करण्यात आली आहे. देशाचे हंगामी पंतप्रधान क्लावडे जोसेफ यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून हल्ल्याचा निषेध केला आहे.

धक्कादायक! हैतीच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Port-au-Prince- हैतीचे अध्यक्ष जोवेनेल मोईस (Jovenel Moïse) यांची त्यांच्या घरात शिरुन हत्या करण्यात आली आहे. देशाचे हंगामी पंतप्रधान क्लावडे जोसेफ यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून हल्ल्याचा निषेध केला आहे. द्वेषपूर्ण, अमानवीय आणि रानटी कृत्यू असं ते म्हणाले आहे. फर्स्ट लेडी मार्टिन मोईस या ही हल्लात जखमी झाल्या असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जवळपास 1.1 कोटी लोकसंख्या असलेला हैती देश अस्थिर आहे. जोवेनेल मोईस यांच्या सत्तेबाबत लोक असंतुष्ट होते. हैती हा कॅरेबियन देश आहे. (Haiti President Jovenel Moise assassinated at home)

देशाची सुरक्षा हैतीचे राष्ट्रीय पोलिस आणि लष्करी सैन्याकडे आहे. लोकशाही आणि गणतंत्राचा विजय होईल, असं जोसेफ म्हणाले. बुधवारी राजधानी पोर्ट-ऑ-प्निन्समध्ये जोवेनेल मोईस यांच्या घरात घुसून हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. यात त्यांच्या पत्नीलाही इजा झाली आहे. हल्लेखोर स्पनिश आणि इंग्रजी बोलत होते. गुरुवारी सकाळी 1 च्या सुमारास हा हल्ला झाला. यापुढे सरकारची सूत्रे माझ्याकडे असून लोकांनी शांत राहावे, असं आवाहन हंगामी पंतप्रधान क्लावडे जोसेफ यांनी केलंय.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

हैती उत्तर अमेरिकेतील सर्वात गरीब देश आहे. अंतर्गत वादांमुळे 2018 मध्ये होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तेव्हापासून जोवेनेल मोईस यांच्याकडे देशाची सूत्रे आहेत. विरोधकांनी त्यांच्या पायउताराची मागणी वारंवार केली होती. हैतीची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. चलनवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. लोकांना अन्न आणि इंधनासाठी झगडावं लागत आहे. देशातील जवळपास 60 टक्के लोक दररोज 2 डॉलरपेक्षा कमी कमाई करतात. हैतीवर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत. 2010 मध्ये आलेला भूकंप आणि 2016 मधील त्सुनामी यामुळे देशाचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री, पाहा कुणाकडे कोणतं खातं?

53 वर्षीय मोईस हे निवडणुका घेण्यास असमर्थ ठरले होते. त्यामुळे संसद विसर्जित करण्यात आली. या काळात मोईस यांनी आपली राजकीय शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातो. त्यांनी न्यायपालिकेचे अधिकार कमी केले होते. तसेच गुप्तचर संस्थेला थेट त्यांना माहिती देण्यास सांगितले होते. हैतीमध्ये पूर्णपणे अनागोंदीची स्थिती आहे. राजकीय संकटासह, अपहरण-खंडणीचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. देशात अनेक हिंसक गँग तयार झाल्या असून त्यांनी दहशत माजवली आहे.

loading image