esakal | मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री, पाहा कुणाकडे कोणतं खातं?
sakal

बोलून बातमी शोधा

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री, पाहा कुणाकडे कोणतं खातं?

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री, पाहा कुणाकडे कोणतं खातं?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळातील पहिला विस्तार करताना 12 मंत्र्यांना नारळ दिला. मुख्यतः मंत्री म्हणून कामगिरी व वय यांच्या निकषावर त्यांना डच्चू मिळाला ही ठळक कारणे आहेत. महाराष्ट्रातून संजय संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर यांची हकालपट्टी केली आहे. बुधवारी झालेल्या विस्तारात मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.बुधवारी राज्याला एक केंद्रीय मंत्रिपद, तर तीन राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले कपिल पाटील वगळता अन्य तिघे प्रथमच संसदेत आले आहेत हे विशेष. डॉ. कराड तर अक्षरशः काही महिन्यांपूर्वीच राज्यसभेत निवडून आले आहेत.

राष्ट्रपती भवनात बुधवारी संध्याकाळी झालेल्या दिमाखदार शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: खडसेंची प्रकृती खालावली; ईडी कार्यालयात हजर राहणार का?

महाराष्ट्राला मिळालेली मंत्रिपदे -

नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग, केंद्रीय मंत्री

पियुष गोयल - वस्त्रोउद्योग केंद्रीय मंत्री

नारायण राणे - लघु आणि मध्यम उद्योग, केंद्रीय मंत्री

आठवले - सामाजिक न्याय, राज्यमंत्रिपद

भागवत कराड, अर्थ राज्यमंत्रिपद

भारती पवार - आरोग्य राज्यमंत्री

रावसाहेब दानवे - रेल्वे राज्यमंत्री

कपील पाटील - पंचायत राज राज्यमंत्री

हेही वाचा: Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...

म्हणून राणे, कराडांना संधी

महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेटलेला मुद्दा पाहता भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन केंद्राने ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न झाला आहे. तर, नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश भाजप आणि शिवसेनेतील दुरावा कायम असल्याचे स्पष्ट करणारा आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत राणेंचा वापर करून शिवसेनेला त्रास देण्याची तसेच कोकणात शिवसेनेला हादरे देण्याची भाजपची खेळीही यातून दिसते आहे.

loading image