Israel Hamas War : '16 वर्षांनंतर हमासच्या तावडीतून गाझा मुक्त'; इस्राइलच्या संरक्षण मंत्र्यांचा मोठा दावा

Gaza is Hamas-Free : यानंतर इस्राइल गाझामधील कारवाई थांबवणार का याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Israel Hamas War
Israel Hamas War eSakal

Israel Defense Minister Statement : हमासच्या तावडीतून तब्बल 16 वर्षांनी गाझा मुक्त झाल्याचा दावा इस्राइलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी केला आहे. त्यांनी एका व्हिडिओ मेसेजमध्ये याबाबत माहिती दिली. हमासचे दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात असल्याचंही ते म्हणाले.

एएफपी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. गॅलंट म्हणाले, "गेल्या 16 वर्षांपासून गाझावर हमासचं नियंत्रण होतं, मात्र आता त्यांच्या तावडीतून गाझा पट्टी मुक्त झाली आहे. हमासचे दहशतवादी दक्षिणेकडे पळ काढत आहेत. पॅलेस्टिनी नागरीक हमासच्या तळांना लुटत आहेत. गाझाच्या नागरिकांना आता (हमासच्या) सरकारवर विश्वास राहिला नाही."

गॅलंट यांनी याचा कोणताही पुरावा दिला नाही. अर्थात, यानंतर इस्राइल गाझामधील कारवाई थांबवणार का याबाबत देखील त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. 7 ऑक्टोबरला हमासने इस्राइलवर मोठा हल्ला केला होता. यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा करत गाझा पट्टीत एअर स्ट्राईक आणि लष्करी कारवाई सुरू केली होती.

Israel Hamas War
China Pakistan Naval Exercise : चीनच्या युद्धनौका कराची बंदरात; पाकिस्तानसोबत मिळून करणार सर्वात मोठा युद्ध सराव

रुग्णालयांवर हल्ले

इस्राइल-हमास युद्धामध्ये आतापर्यंत 11 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुमारे 5 हजार लहान मुलांचा समावेश असल्याचं माध्यमांमध्ये सांगितलं जातंय. इस्राइल रुग्णालयांवर हल्ले करत असल्याचा आरोप एकीकडून केला जातोय, तर रुग्णालये हमासचे बेस असल्याचा दावा इस्राइलने केला आहे. (Global News)

नवजात बालकांवर लक्ष

गाझामधील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या अल शिफा रुग्णालयात सुमारे 2,300 लोक आहेत. यातील 650 रुग्ण आहेत, 200 ते 500 वैद्यकीय कर्मचारी आहेत, आणि 1500 विस्थापित पॅलेस्टिनी नागरिक आहेत. या रुग्णालयात सुमारे 30 नवजात बालकं देखील असल्याची माहिती हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या बालकांना तरी किमान इजिप्तला हलवण्यात यावं अशी मागणी तेथील डॉक्टरांनी केली आहे.

Israel Hamas War
Israel-Hamas war : इस्राइलविरोधात कोणताही ठोस निर्णय नाही; ५७ मुस्लिम देशांची बैठक निष्फळ

गाझाचे उप-आरोग्य मंत्री युसूफ अबू रिश यांनी सांगितलं, की वीज नसल्यामुळे उत्तरेकडे असणारी सर्व रुग्णालये बंद आहेत. अल शिफा रुग्णालयातच वीजेच्या अभावामुळे 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टी पूर्णपणे इस्राइलच्या ताब्यात आहे, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com