हरीश साळवे ब्रिटनच्या राणीचे वकील

वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

  • ब्रिटन सरकारकडून नियुक्तीची घोषणा

लंडन : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने 13 जानेवारी रोजीच नव्या नियुक्‍त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्धीस दिली असून, त्यामध्ये साळवे यांच्या नावाचाही समावेश आहे. यंदाच 16 मार्च रोजी ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून त्यांची औपचारिक निवड केली जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्यांनाच महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रामध्ये मोठे योगदान असल्याने त्यांना बहुमान मिळाला आहे, अशी माहिती शाही घराण्याच्या सूत्रांनी दिली.

भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?

हरीश साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून कायदा शाखेची पदवी घेतली असून, त्यांनी कायदा क्षेत्रातील त्यांचे करिअर 1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनीसोबत सुरू केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने 1992 मध्ये त्यांची ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून निवड केली होती. साळवे हे 1992 ते 2002 या काळामध्ये सॉलिसिटर जनरलदेखील होते. देश आणि परदेशातील अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीमध्ये साळवे यांचा सहभाग आहे. भारताचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये मांडण्याची कामगिरी त्यांनी चोखपणे पार पाडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harish Salve Appointed As Queen's Counsel