हरप्रित चंडींनी घडवला इतिहास, उणे ५० अंश सेल्सिअस तापमानात ट्रेक पूर्ण

अशा प्रकारचा ट्रेक करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत.
Harprit Chandi
Harprit ChandiSakal

लंडन : दक्षिण गोलार्धावर तुफान हिमवृष्टीमध्ये चाळीस दिवस आणि अकराशे किलोमीटरचा अत्यंत अवघड ट्रेक एकटीने, कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करत ब्रिटिश सैन्यातील भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रित चंडी (Captain Harprit Chandi) या महिला अधिकाऱ्याने इतिहास घडविला आहे. अशा प्रकारचा ट्रेक (Trek) करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. (Global News)

हरप्रित चंडी या ब्रिटिश सैन्यातील महिला शीख अधिकारी आहेत. त्या फिजिओथेरेपिस्ट आहेत. त्यांनी काल (ता. ३) त्यांच्या लाइव्ह ब्लॉगद्वारे आपल्या कामगिरीची माहिती दिली. ‘पोलार प्रित’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या हरप्रित यांनी दक्षिण गोलार्धातील उणे ५० अंश सेल्सिअस तापमानात ही कामगिरी केली. चाळीस दिवसांच्या या ट्रेकमध्ये त्यांनी स्लेजवर (बर्फात ढकलायची गाडी) आपले सर्व सामान लादत एकटीने ती ओढत प्रवास केला.

Harprit Chandi
‘मदत करा, माझा जन्म ३१ डिसेंबरला झाला’ अन्...

या चाळीस दिवसांत त्यांनी १,१२७ किलोमीटर अंतर कापले. या ट्रेकमध्ये त्यांनी अनेकदा ६० किमी प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यांचा सामना केला. अवजड स्लेज गाडी ओढण्यासाठी त्यांनी गेले काही महिने दोन अवजड टायर ओढण्याचा सराव केला होता.

कॅप्टन हरप्रित चंडी यांनी ट्रेकच्या सुरुवातीलपासून लाइव्ह ट्रॅकिंग मॅप अपलोड केला होता. वेळोवेळी त्यांनी ब्लॉग लिहून मोहिमेची माहितीही दिली होती. आपल्याला हवे ते आपण साध्य करू शकतो, तुम्ही कोणत्याही क्षणी आणि कोठूनही स्वत:चे ध्येय साध्य करण्याची मोहिम सुरु करू शकता, असे प्रोत्साहनही त्यांनी इतरांना दिले आहे.

Harprit Chandi
अमेरिकेत एका दिवसात १० लाख रुग्ण; आधीच्या तुलनेत तीनपट जास्त

लवकरच विवाह करणार

बत्तीस वर्षांच्या हरप्रित या ब्रिटिश सैन्यातील वैद्यकीय तुकडीचा एक भाग आहेत. सैन्यातील इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम त्या करतात. क्रीडा वैद्यकीय पदवीचाही त्या अभ्यास करत आहेत. ट्रेकच्या चाळीस दिवसांच्या एकांतपणाच्या काळात त्यांनी आपल्या विवाहाचे नियोजन केले आहे. सैन्यातीलच डेव्हिड जार्मन यांच्याशी त्या विवाह करणार आहेत. दक्षिण गोलार्धातील मोहिम संपवून हे दोघे चिलीमध्ये एकत्र येणार असून नंतर लंडनमध्ये आल्यावर विवाह करणार आहेत.

आपल्या क्षमतेच्या मर्यांदाचा विस्तार करा आणि स्वत:वर विश्‍वास ठेवा, हे सर्वांना सांगण्यासाठीच मी हा ट्रेक केला. प्रवाहाच्या विरोधात न जाताही तुम्ही हे करू शकता. मला अनेकांनी अनेक वेळा हा ट्रेक न करण्यास आणि इतरांप्रमाणे सर्वसामान्य जीवन जगण्यास सांगितले. मात्र, आपणच आपले ‘सर्वसामान्य’ जीवन घडवतो. तुम्हाला जे हवे ते साध्य करण्याची तुमच्यात क्षमता आहे.

- कॅप्टन हरप्रित चंडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com