Newborn Baby Found : ‘मदत करा, माझा जन्म ३१ डिसेंबरला झाला’ अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baby

‘मदत करा, माझा जन्म ३१ डिसेंबरला झाला’ अन्...

अमेरिकेतील (America) अलास्का (Alaska) येथील महिलेने नवजात मुलाला सोडल्याची (Newborn baby found) घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर महिलेने मुलासोबत पत्रही सोडले. या पत्रातून महिलेने असे का केले सांगितले आहे. महिलेने मुलाच्या संदर्भाने हे पत्र लिहिले आहे. एका महिलेने या मुलाला रडताना पाहिल्यानंतर ही घटना उघड झाली. हे पत्र सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

‘इंडिपेंडंट’च्या ऑनलाइन वृत्तानुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. अलास्का येथील फेअरबँक्स येथे राहणारी महिला रस्त्यावरून जात असताना तिला एका डब्यातून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. महिलेला आधी धक्काच बसला. तिने जवळ जाऊन पाहिल्यावर संवेदना उडाल्या. त्या डब्यात एक नवजात बाळ पडलेले होते.

हेही वाचा: आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

डब्यात मूल पडल्याचे पाहताच (Newborn baby found) महिलेने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी बरेच लोक जमा झाले. इतक्यात मुलाजवळ एक पत्र पडलेले दिसले. ते पत्र उघडले असता मुलाच्या आईनेच मुलाच्या संदर्भाने लिहिले असल्याचे समोर आले. त्यावर लिहिले होते, ‘मला मदत करा, माझा जन्म ३१ डिसेंबरला झाला. माझ्या आई-वडिलांकडे आणि आजी-आजोबांकडे माझा सांभाळ करण्यासाठी पैसे नाहीत. माझी आई खूप दुःखी आहे. कोणीतरी मला घेऊन जा, जेणेकरून मलाही कुटुंब मिळेल.’

पत्र वाचल्यानंतर लोकांना समजले की आईने गरिबीमुळे मुलाला सोडले. हे पत्र त्याच महिलेने सोशल मीडियावर शेअर केले जिने पहिल्यांदाच मुलाला बघितले होते. या पत्रावर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. काही लोकांनी असेही म्हटले आहे की, मुलाच्या आईने मुलाला कुठल्यातरी आश्रमात किंवा संस्थेला द्यायला हवे होते. या अवस्थेत सोडायला नको होते.

हेही वाचा: कोरोना वाढतोय, शाळांबाबत निर्णय नाहीच; सीबीएसई शाळा उद्यापासून

मुलाला रुग्णालयात नेण्यात आले असून, काळजी घेतली जात आहे. हे देखील आश्चर्यकारक आहे की अलास्कामध्ये (Alaska) सध्या खूप थंडी पडत आहे. ज्या दिवशी हे मूल सापडले त्या दिवशी तेथील तापमान १० अंशांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही मुल जिवंत अवस्थेत पडलेले आढळून आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social MediaamericaAlaska
loading image
go to top