12व्या वर्षांपासून तो रोज सेल्फी काढायचा; लग्नानंतर केलेला भन्नाट व्हिडिओ एकदा बघाच

selfie video
selfie video

ओटावा - सतत सेल्फी काढण्याची अनेकांना सवय असते. कित्येकदा एकाच पोझमध्ये सेल्फी काढले जातात. अशा लोकांना आजुबाजुचे लोक त्यावरून बोलतही असतात. मात्र तरीही सेल्फीची सवय काही कमी होत नाही. आता अशाच एका सेल्फीवेड्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याने 10 वर्षे एकाच पोझमध्ये सेल्फी काढले.

वयाच्या 12 व्या वर्षापासून ते 22 व्या वर्षी लग्न होईपर्यंत त्याने दररोज किमान एक तरी सेल्फी काढला. आता एवढ्या सेल्फींचे त्याने काय केले असा प्रश्न पडला असेल. कॅनडात राहणाऱ्या या ह्युगो कॉर्लीनियरने या सर्व सेल्फींचा एक व्हिडओ तयार केला. जगातल्या अनोख्या आणि क्रिएटीव्ह अशा व्हिडिओपैकी तो एक आहे. 

कॅनडात राहणारा ह्युगो कॉर्लीनियर 2008 मध्ये फक्त 12 वर्षांचा होता. त्यावेळी शाळेत जाताना त्याले एका प्रसिद्ध फोटोग्राफरने तयार केलेला टाइम फ्रेम व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये कोणाचं तरी लाइफ दररोज कसं बदलतं हे दाखवलं होतं. तो व्हिडिओ पाहून ह्युगो इतका प्रभावित झाला की तेव्हापासून दररोज एकाच पोझमध्ये सेल्फी घ्यायला सुरुवात केली. 

सुरुवातीला ह्युगोच्या सेल्फीच्या उद्योगाकडे घरच्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनीही फारसं लक्ष दिलं नाही मात्र ह्युगोचं हे वेड सुरूच राहिलं. वयाच्या बाराव्या वर्षी सुरु झालेलं हे सेल्फीचं वेड लग्नाच्या दिवशीच थांबलं. इतक्या वर्षात ह्युगोने काढलेले सर्व सेल्फी एकत्र केले आणि त्यांचा व्हिडिओ तयार केला. जवळपास अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्याने 25 हजार सेल्फी टाकल्या आहेत. एका सेकंदात जवळपास 30 पिक्सच्या स्पीडने मूव्ह होतात. यातून एका लहान मुलाची त्याच्या लग्नापर्यंत झालेली वाढ दिसते. 

व्हिडिओमध्ये ह्युगोचा चेहरा नेहमीच सेंटरला दिसतो. त्यासाठी त्याने फोटो विशिष्ठ पद्धतीने सेट केले. यासाठी जवळपास 50 हून अधिक तासांचा वेळ लागला. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तो हसताना दिसत नाही. याबद्दलही ह्युगो म्हणतो की, माझ्या चेहऱ्यात कसा बदल होतो हे कॅप्चर करायचं होतं. इतक्या वर्षांच्या सेल्फीत ते स्पष्ट जाणवावं यासाठी एकसारखा चेहरा ठेवण्याच्या दृष्टीने कधीच हसून सेल्फी काढला नाही. 

लग्नापर्यंतच्या फोटोंचा व्हिडिओ इतका व्हायरल झाल्यावर त्याला अनेकांनी विचारलं की यापुढेही तु हे करत राहणार आहेस का. तर त्याने हो अजुनही सेल्फी काढतो आणि असा व्हिडिओ करण्याचा विचार असल्याचं उत्तर त्याने दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिलं आहे. इंग्लंडमध्ये जन्म झालेल्या ह्युगोने सर्वाधिक काळ कॅनडातच घालवला.

Edited By - Suraj Yadav

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com