

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्य भागात वातावरणात वेगाने बदल झाला असून अपेक्षेपेक्षा अधिक हिमवर्षाव होत आहे. वाऱ्यांचा वेगही वाढला असल्याने तापमानाचा पारा खाली आला आहे. या परिस्थितीमुळे प्रवास अत्यंत धोकादायक बनला असून काही ठिकाणी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रस्त्यांवरही बर्फ साचला असून रस्ते निसरडे झाले आहेत.