फुग्यांच्या साह्याने लाखो पत्रके टाकली उत्तर कोरियाच्या हद्दीत

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जून 2020

दक्षिण कोरियातील काही कार्यकर्त्यांनी काल रात्री फुग्यांच्या साह्याने लाखो पत्रके उत्तर कोरियाच्या हद्दीत टाकली. अशा प्रकारची पत्रके न टाकण्याची उत्तर कोरियाकडून धमकी मिळाल्यावरही अशा घटना होत आहेत.

सोल - दक्षिण कोरियातील काही कार्यकर्त्यांनी काल रात्री फुग्यांच्या साह्याने लाखो पत्रके उत्तर कोरियाच्या हद्दीत टाकली. अशा प्रकारची पत्रके न टाकण्याची उत्तर कोरियाकडून धमकी मिळाल्यावरही अशा घटना होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून, दोघांनी एकमेकांशी असलेले व्यवहार पूर्णपणे बंद केले आहेत. या पत्रकांमध्ये उत्तर कोरियाच्या नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकांबरोबर काही पैसे आणि पुस्तकेही फुग्यांद्वारे पाठविण्यात आली. 

चीनने नेपाळला गुंडाळलं; बळकावला तब्बल एवढा भूभाग

उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात निघून आलेले कार्यकर्ते पार्क सान्ग-हक यांच्या संघटनेने या पत्रकांची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘उत्तर कोरियामधील किम जोंग उन हे दुष्ट असून त्यांची राजवट रानटी आहे. माझ्या जिवाला धोका असला तरी मी पत्रके पाठवतच राहणार. कोणतेही अधिकार नसलेले उत्तर कोरियाचे नागरिक आधुनिक काळातील गुलाम बनले असले तरी त्यांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार निश्‍चितच आहे,’ असे सान्ग-हक यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of balloons millions of leaflets were thrown into the North Korean border

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: