चीनने नेपाळला गुंडाळलं; बळकावला तब्बल एवढा भूभाग

China encroaching our land  may set up border outposts here says Nepal govt
China encroaching our land may set up border outposts here says Nepal govt

नवी दिल्ली : चीनने नेपाळचा तब्बल ३३ हेक्टर भूभाग बळकावला असल्याचे धक्कादायक खुलासा नेपाळ सरकारच्याच एका अहवालामध्ये करण्यात आला आहे. तसेच नदी पात्र बदलून आणखी प्रदेश बळकावण्याची शक्यता असल्याचाही अंदाज आहे. नेपाळच्या सीमा भागावर चीन लवकरच लष्करी छावणी उभारु शकते असेही या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या हिंसेनंतर नेपाळ सरकारचा हा अहवाल समोर आला आहे. चीन तिबेटमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर करुन चीन हा भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे नेपाळकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नेपाळमधील कृषी खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या जमीन मोजणीसंदर्भातील सर्वेक्षण खात्याने ११ ठिकाणांची यादी आपल्या अहवालामध्ये दिली आहे. या ११ पैकी १० ठिकाणी चीनने ताबा मारला असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, नेपाळच्या सीमेजवळची अधिक अधिक जमीन आपल्या ताब्यात यावी यासाठी चीन नद्यांचा प्रवाह बदलत असल्याचेही धक्कादायक वृत्त या अहवालात दिले आहे.
-----------
लष्करप्रमुख मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
-----------
भारत चीन वादात पडण्यास रशियाचा नकार
-----------
चीनने नेमके काय केले?

नेपाळच्या हुमला जिल्ह्यातील बगदारी खोला नदी आणि कर्नाली नदीचा प्रवाह चीनने बदलला असून येथे बांधकाम चालू केले असल्याचेही सांगण्यात आले आहे. या माध्यमातून या जिल्ह्यातील १० हेक्टर म्हणजे जवळपास २५ एकर जमीन चीनने ताब्यात घेतली आहे. तसेच, रासुवा जिल्ह्यातील जवळपास सहा हेक्टर म्हणजेच १५ एकर जमीनीवर चीनने ताबा मिळवला आहे आणि तिबेटमधील बांधकाम करण्यासाठी नेपाळमध्ये येणाऱ्या सीनजेन, भूर्जूक आणि जांम्बू खोला नदीचे पात्र बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नेपाळवर काय होणार परिणाम?
चीन बांधकामाच्या नावाखाली अशाच पद्धतीने नद्यांचा प्रवाह बदलत राहिल्यास नेपाळच्या ताब्यातील जमीनीवर चीन ताबा मिळवू शकतो. नद्यांचे प्रवाह असेच बदलत राहिले तर नेपाळच्या मालकीचा बराच भूखंड हा नैसर्गिक दृष्ट्या तिबेट ऑटोनॉमस रिजन म्हणजेच तिबेटकडे जाईल. पुढील काही काळामध्ये या ठिकाणी चीन बॉर्डर ऑरझर्वेशन पोस्ट (बीपीओ) चौक्या उभारण्याची दाट शक्यात आहे. या चौक्यांवर लवकरच शसस्त्र पोलिस गस्त घालताना दिसतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com