स्वित्झर्लंडमध्ये हिजाब बंदी! सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकल्यास 82 हजारांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hijab

स्वित्झर्लंडमध्ये हिजाब बंदी! सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकल्यास 82 हजारांचा दंड

नवी दिल्ली : इराणमध्ये हिजाबच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्येही याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. स्विस सरकारने आता 'बुरखा बंदी' कायद्यांतर्गत चेहरा झाकल्याबद्दल दंड आकारण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. शिवाय दंडाची रक्कम 900 पौंड म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. hijab ban news in Marathi

हेही वाचा: Hijab Ban Controversy: मुलींना अल्लाहने हिजाब घालण्यास सांगितलय; ओवेसींचा अजब दावा

सध्या सरकारने मसुदा तयार करून मंजुरीसाठी संसदेत पाठवला आहे. तथापि, यामध्ये अनेक सवलती देखील देण्यात आल्या आहेत, जसे की राजकीय सभागृह, प्रार्थनास्थळे आणि उड्डाणांमध्ये चेहरा झाकण्यास बंदी लागू होणार नाही. याशिवाय, आरोग्य, सुरक्षा, हवामान आणि स्थानिक रीतिरिवाजांशी संबंधित कारणांसाठी चेहरा झाकणे वैध मानले जाईल. यामध्ये कलात्मक कार्यक्रम आणि जाहिरातींनाही सूट देण्यात आली आहे.

स्वित्झर्लंड सरकारने म्हटलं की, प्रशासनाची मंजुरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा वापर करून मास्क घालण्याची परवानगी दिली जाईल. स्वित्झर्लंडमध्ये गेल्या वर्षी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. ज्या गटाने इस्लामिक मिनारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला होता, त्याच गटाने हा प्रस्ताव तयार केला आहे.

हेही वाचा: Farooq Abdullah: प्रभू श्रीराम केवळ हिंदुंचेच का? ते सर्वांचेच; अब्दुल्ला यांचं विधान

एका निवेदनात, कॅबिनेटने म्हटले की चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याचा उद्देश सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था राखणे आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, बंदीच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, 'चेहरा झाकणे हे कट्टरतावादाचे प्रतीक आहे'.

टॅग्स :SwitzerlandHijab