Hijab Row: कुठे सक्ती, कुठे बंदी; कोणत्या देशात काय आहे कायदा ?

जगभरातील काही देशात हिजाब घालण्याची सक्ती आहे, तर काही देशात हिजाबवर पूर्णपणे बंदी आहे.
Hijab laws in different countries of the world
Hijab laws in different countries of the worldSakal

कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमधील मुस्लिम विद्यार्थीनींना हिजाब घातल्यास प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटकात सुरु झालेल्या या वादामुळे देशभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही या वादात उडी घेतली आहे. परंतु हिजाब (Hijab) किंवा बुरख्याच्या मुद्द्यावरून फक्त भारतातच नाही तर इतर अनेक देशांत वाद झाल्याचं तुम्हाला माहिती आहे का? यापूर्वी जगभरातील अनेक देशांत या विषयावरून वाद झाले आहेत. अनेक देशांत हिजाब घालण्यावर प्रतिबंध आहे. काही देशात तर हिजाबला पूर्ण बंदी आहे. जगातील विविध देशात याविषयी कायदे आहेत. जाणून घेऊया या कायद्यांबद्दल... (Hijab laws in different countries of the World)

Hijab laws in different countries of the world
हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; सोलापूर-विजापूर महामार्गावर 'रास्ता रोको'

1. फ्रान्स (France) - फ्रांसमध्ये 2010 पासून बुरखा आणि हिजाबवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महिलांना बरोबरीचा अधिकार मिळावा यासाठी हा कायदा केल्याचं फ्रान्सने म्हटले आहे.

2. चीन (China) - चीनमध्ये सार्वजनिक बसमध्ये हिजाब घालण्यास बंदी आहे.

3. डेन्मार्क (Denmark) -डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी आहे. 2018 मध्ये डेन्मार्कच्या संसदेत हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार डेन्मार्कच्या पोलिसांना कोणत्याही महिलेने बुरखा किंवा हिजाबने चेहरा झाकलेला आढळल्यास कारवाईचा अधिकार देण्यात आला आहे. पोलीस त्या महिलांना हिजाब हटवण्यास सांगू शकतात.

Hijab laws in different countries of the world
घुंघट, दुपट्टा आणि हिजाब भारतीय महिलांचा दागिना - नवाब मलिक

1. फ्रान्स (France - फ्रांसमध्ये 2010 पासून बुरखा आणि हिजाबवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महिलांना बरोबरीचा अधिकार मिळावा यासाठी हा कायदा केल्याचं फ्रान्सने म्हटले आहे.

2. चीन (China) - चीनमध्ये सार्वजनिक बसमध्ये हिजाब घालण्यास बंदी आहे.

3. डेन्मार्क (Denmark) -डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी आहे. 2018 मध्ये डेन्मार्कच्या संसदेत हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार डेन्मार्कच्या पोलिसांना कोणत्याही महिलेने बुरखा किंवा हिजाबने चेहरा झाकलेला आढळल्यास कारवाईचा अधिकार देण्यात आला आहे. पोलीस त्या महिलांना हिजाब हटवण्यास सांगू शकतात.

4. जर्मनी (Germany) - 2017 जर्मनीत सरकारी कर्मचारी, न्यायाधीश तसेच सैनिकांनी चेहरा पूर्ण झाकण्यास बंदी घालण्यात आला आहे.

Hijab laws in different countries of the world
Karnataka : हिजाब वादात आता पाकिस्तानच्या मलालाची उडी

5. श्रीलंका (Shrilanka)- काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

6. बेल्जियम (Belgium) -बेल्जियममध्ये 2011 पासून बुरखा घालण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

7. नेदरलँड (Netherlands) - 2016 मध्ये येथील काही ठिकाणी बुरखा आणि हिजाबला पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तेथील नियंमानुसार शाळा, विमानतळांसारख्या ठिकामी चेहरा झाकला जाऊ शकत नाही. ज्या ज्या ठिकाणी महिलांना आपले ओळखपत्र दाखवावं लागते अशा ठिकाणीही चेहरा झाकता येत नाही.

8. कॅमरून (Cameron) - 2015 पासून कॅमरूनमध्ये बुरख्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. येथे दोन महिलांना बुरखा घालून आत्माघाती हल्ला केला होता.

Hijab laws in different countries of the world
शाळांमध्ये गणवेश आवश्यकच; हिजाब वादावर आदित्य ठाकरेंचे मत

9. इटली (Italy)- येथील लोम्बार्डीमध्ये महिलांना बुरखा परिधान करण्यास बंदी आहे.

10. सौदी अरेबिया (Saudi Arabia) - या देशामध्ये महिलांना हिजाब, बुरख्यासह अबाया परिधान करावा लागतो. ज्या ठिकाणी कुटूंबातील पुरुषांशिवाय इतर पुरुष असतील तेथे त्यांना बुरखा घालावा लागतो.

11. इराण (Iran) - 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये हिजाब अनिवार्य आहे. महिलांना सार्वजनिक ठिकाणांवर जाताना ढीले कपडे परिधान करणे आणि डोकं, चेहरा आणि मान पूर्णपणे झाकण्याचे आदेश आहेत.

12. पाकिस्तान (Pakistan) - पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश असल्यामुळे तिथेही बुरख्यासाठी कोणतेही कायदे नाहीत. या देशात महिलांनी बुरखा घालणे सामान्य आहे आणि त्या मर्जीने घालतात.

13. इंडोनेशिया (Indonesia) - हासुद्धा मुस्लिमबहुल देश आहे. जिथे महिलांना बुरखा किंवा हिजाब घालायचा की नाही हे स्वतः ठरवण्याचा अधिकार दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com