न्यायाधीशांना जबाबदार धरा : ट्रम्प

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जर खुनी असतील तर अमेरिकाही निरागस देश नाही. अमेरिकेने अनेक चुका केल्या असून, त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतही अनेक खुनी आहेत हे विसरू नये.
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

वॉशिंग्टन : अमेरिकेत काही दुर्दैवी घटना घडल्यास न्यायाधीशांना आणि न्याय व्यवस्थेला अमेरिकी नागरिकांनी जबाबदार धरावे. एका न्यायाधीशाने अमेरिकेला किती मोठ्या संकटात टाकले आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अमेरिकेत विदेशी नागरिकांचे लोंढेच्या लोंढे दाखल होत आहेत. त्यामुळे या सर्वांची अधिक काटेकोर तपासणी करण्याचे आदेश मी संबंधित विभागाला दिले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयामुळे काम करणे अवघड झाले आहे, अशी टीका अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाला सॅन फ्रान्सिस्कोतील अपिलीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या न्यायाधीशांवर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मात्र, न्यायाधीशांवर टीका करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: hold judges responsible, says trump