esakal | परदेशस्थ भारतीयांचे ‘होम कमिंग’
sakal

बोलून बातमी शोधा

Foreigner

कैदी मायदेशी 
बहारीनमध्ये सरकारने शिक्षेत सूट दिलेले १२५ भारतीय कैदी आज विशेष विमानाने मायदेशी दाखल झाले. आता या सर्वांना नौदलाच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.  १२७ भारतीय नागरिकांना घेऊन येणारे  गल्फ एअर कंपनीचे हे विमान आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास येथील विमानतळावर उतरले.

परदेशस्थ भारतीयांचे ‘होम कमिंग’

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - कोरोनामुळे परदेशस्थ भारतीयांनी मायदेशाचा रस्ता धरला आहे. अमेरिकेतून आणखी १६१ भारतीय नागरिक मायदेशी परतणार असून ही सर्व मंडळी मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत आली होती. या सर्व नागरिकांना आणण्यासाठी एक विशेष विमान पंजाब येथील अमृतसरमधून अमेरिकेला रवाना होणार आहे. मायदेशी परतणाऱ्यामध्ये हरियानातील ७६, पंजाबमधील ५६, गुजरातमधील १२, उत्तरप्रदेशातील पाच, महाराष्ट्रातील चार आणि केरळ, तेलंगण आणि तामिळनाडू येथील प्रत्येका दोघांचा समावेश असून आंध्र, गोव्यातील प्रत्येकी एकजण यात आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बांगलादेशातून १६९ मायदेशी
कोलकता - वंदे भारत मोहिमेअंतर्गत पश्चिम बंगालमधील भारतीयांची पहिली तुकडी आज सकाळी विशेष विमानाच्या माध्यमातून येथील विमानतळावर दाखल झाली. हे सर्व १६९ नागरिक बांगलादेशातून येथे आले आहेत. यातील तिघांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये एक गर्भवतीचा देखील समावेश आहे.