ब्रिटनकडून हाँगकाँगचा प्रत्यर्पण करारास स्थगिती

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी संसदेत सांगितले की, हा करार तातडीने स्थगित करण्यात आला आहे. आता चीनविरुद्धच्या शस्र्त्रास्त्र निर्बंधांत हाँगकाँगचाही समावेश होईल. अंतर्गत दडपशाहीसाठी वापरली जाणारी बेड्या, अश्रुधुराची नळकांडी अशा कोणत्याही वस्तू निर्यात केल्या जाणार नाहीत. चीनने लागू केलेल्या कायद्याचा गैरवापर करून प्रत्यर्पणाचे प्रयत्न रोखता यावेत असा आमचा उद्देश आहे.

लंडन - हाँगकाँगबरोबरील प्रत्यर्पण करार स्थगित करण्याची घोषणा ब्रिटनने केली आहे. पूर्वाश्रमीच्या ब्रिटिश वसाहतीत चीनने नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी संसदेत सांगितले की, हा करार तातडीने स्थगित करण्यात आला आहे. आता चीनविरुद्धच्या शस्र्त्रास्त्र निर्बंधांत हाँगकाँगचाही समावेश होईल. अंतर्गत दडपशाहीसाठी वापरली जाणारी बेड्या, अश्रुधुराची नळकांडी अशा कोणत्याही वस्तू निर्यात केल्या जाणार नाहीत. चीनने लागू केलेल्या कायद्याचा गैरवापर करून प्रत्यर्पणाचे प्रयत्न रोखता यावेत असा आमचा उद्देश आहे. त्यासाठी सुस्पष्ट आणि भक्कम तरतुदी करणार आहोत. तोपर्यंत ही उपाययोजना कायम राहील. 

आणखी अकरा चीनी कंपन्यांना बडगा; उइगर मुद्द्यावरून अमेरिकेने केले ब्लॅकलिस्ट 

उइगर मुस्लिमांच्या छळाबद्दल राब यांनी सांगितले की, आम्ही संयमाने पुरावे गोळा करू आणि मगच कारवाईचा निर्णय घेऊ. यास अनेक महिने लागू शकतात.

लंडनस्थित कायदेतज्ञ नीक वॅमोस यांनी सांगितले की, वास्तविक उभय देशांतील प्रत्यर्पणाचे प्रसंग अत्यंत दुर्मीळ आहेत. त्यामुळे हा निर्णय प्रतिकात्मक, पण अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

रशियाच्या हस्तक्षेपाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष; ब्रिटनमध्ये अहवाल प्रसिद्ध

2015 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी चीनबरोबरी संबंधांचे सोनेरी युग सुरु झाल्याची भावना व्यक्त केली होती. त्यानंतर मात्र उभय देशांतील संबंध विकोपाला गेले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगचा आर्थिक प्राधान्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी प्रत्यर्पण करार स्थगित केले. त्यात आता ब्रिटनचीही भर पडली आहे.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी हुवेई या चिनी कंपन्यांची 5जी नेटवर्कमधील उपकरणे 2027 पर्यंत काढून टाकण्याचा आदेश जाहीर केला होता.

चीनचे प्रत्यूत्तर
ब्रिटनच्या घोषणेविरुद्ध ताकदवान प्रतिआक्रमण करण्याचा इशारा चीनने दिला. परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी सांगितले की, ब्रिटनचा निर्णय चुकीचा आहे. हाँगकाँगमधील आपला वसाहतवादी प्रभाव कामय ठेवण्याचा कल्पनाविलास ब्रिटनने सोडून द्यावा आणि या चुकीत तातडीने दुरुस्ती करावी.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hong Kong extradition agreement from Britain suspended