हाँगकाँग पोलिसांकडून ४७ कार्यकर्त्यांना अटक

hongkong
hongkong

हाँगकाँग - फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी कट रचल्यच्या आरोपाखाली हाँगकाँग पोलिसांनी आज ४७ लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली. यामध्ये काही माजी लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. त्यांना जानेवारीमध्येही अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर सोडून देण्यात आले होते. आता त्यांना बेकायदा पद्धतीने निवडणूकीची प्रक्रिया राबविल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

हाँगकाँगमधील आगामी निवडणूकीत सर्वोत्तम उमेदवारांना उतरविण्यासाठी त्यांनी समांतर निवडणूक प्रक्रिया राबविली होती. यात निवडून येणाऱ्यांना मुख्य निवडणूकीत उतरवून विजयी करायचे आणि बहुमत मिळवत हाँगकाँगविरोधी कायदे रद्द करायचे, अशी त्यांची योजना होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com