एक हात निकामी, डोळ्यांपुढं अंधार; तरीही लाछिमान गुरुंगनं २०० सैनिकांचा केला होता सामना

लाछिमान गुरुंग
लाछिमान गुरुंगe sakal

भारतीय सेनेचे माजी फील्ड मार्शल सॅम मानेकशा एकदा म्हणाले होते, की 'जर एखादा माणूस त्याला मरणाची भीती वाटत नाही असे म्हणत असेल तर तो खोट बोलतोय किंवा तो गुरखा (gurkha) तरी असावा.' पण ते असं का म्हणाले? आणि हा गुरखा (gurkha) म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आजही गुरखा रेजिमेंट (gurkha regiment) हे अनेक सैन्य दलाचा अभिमान आहे. (how a one armed gurkha lachhiman gurung fought 200 japanese troops)

लाछिमान गुरुंग
इस्राईलच्या शहरांवर रॉकेटचा वर्षाव; 212 जणांचा मृत्यू

ईस्ट इंडिया कंपनीने (east india company) १८१४ मध्ये नेपाळच्या राज्यांमध्ये कब्जा करण्याच्या उद्देशाने फेरफटका मारण्यास सुरुवात केली होती. त्यांना विश्वास होता की नेपाळी लोक त्यांना शरण येतील. मात्र, ते चुकीचे ठरले होते. या त्यांच्या आक्रमणामुळे केवळ त्यांच्या खिशाला कात्री लागली नाहीतर त्यांच्या सैनिकांनाही याची किंमती मोजावी लागली. गुरखांनी ब्रिटीशांच्या (british) नाकी नऊ आणले होते. जवळपास १८१६ मध्ये अँग्लो-नेपाळी यांच्यामधील युद्ध संपले. यामधून आपल्या शत्रूला कमी लेखू नये, असा धडा ब्रिटीशांनी घेतला होता. इतरांच्या देखील ते लक्षात आले. त्यामुळे अनेक देशांमध्ये गुरख्यांची भरती केली जाते. नेपाळमधील गोरखा जिल्ह्यातील (gorkha district in nepal) असणारे गुरखा हे आता देशातील सर्व भागांमधून इतर देशांमध्ये जात असतात. ते ब्रिटीश आर्मीमध्ये (british amry) त्यांच्या सेवेसाठी ओळखले जातात. ब्रिटिश सैन्याचा उल्लेखनीय भाग असलेल्या गुरखा रेजिमेंटनं इराक युध्दही लढलं आहे.

उंची ४ फूट ११ इंच, तरीही लढवय्या -

गरीबीमुळे ते इतर देश किंवा ब्रिटेनमध्ये सेवा देण्यास इच्छुक असतात. दुर्दैवाने त्यांच्यावर आजही तीच परिस्थिती आहे. पण, गुरखा रेजिमेंटचे सैनिक प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याच गुरखा रेजिमेंटशी जोडलेल्या एका गुरखाचं नाव अभिमानं घेतलं जातं, ते म्हणजे लाछिमान गुरुंग. लाछिमान यांचा जन्म हा नेपाळमधील टाहानी जिल्ह्यातील ढाकणी या गावात ३० डिसेंबर १९१७ ला झाला होता. ते अतिशय गरीब कुटुंबातील होते. दरीद्री आणि कुपोषणामुळे वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंतही त्यांची फक्त ४ फूट ११ इंच इतकीच वाढ झाली होती. तरीही ते शरीरानं अगदी काटक होते. गुरुंग हे सातत्याने ब्रिटीश आर्मीमध्ये भरती होण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची उंची कमी होती आणि इतर नेपाळींच्या तुलनेत देखील ते उंचीनं लहान होते. त्यामुळे त्यांना सतत नकार मिळत होता. मात्र, ते निराश झाले नाहीत. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवलेत आणि अशीच एक सुवर्णसंधी त्यांच्याकडे चालून आली. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी ब्रिटीशांना अनेक सैनिकांची गरज होती. त्यामुळे २३ वर्षांच्या लाछिमानला १९४० मध्ये ब्रिटीश आर्मीमध्ये भरती करून घेण्यात आलं. ते उंचीनं लहान असले तरी त्यांचा प्रत्येक गोष्टींबाबतचा दृढनिश्चय पक्का होता. त्यांनी आठव्या गुरखा राफयलच्या चौथ्या बटालियानमध्ये रायफलमॅन म्हणून स्थानही मिळविले.

लाछिमान गुरुंग
इस्राईलच्या शहरांवर रॉकेटचा वर्षाव; 212 जणांचा मृत्यू

जपानी सैनिक अन् गुरखा रेजिमेंट युद्ध -

गुरुंग यांची बटालियन १९४५ च्या एप्रिल महिन्यात मोहिमेवर निघाली. बर्माच्या (आताचं म्यानमार) इरावदी (इरावती) नदीला पार करून जपानी सैन्यावर हल्लाबोल करण्याची त्यांची मोहिम होती. आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय? याची जपानी लोकांना पुसटशी कल्पनाही नव्हती. गुरुंगच्या बटालियनला पाहून जपानी सैनिक आश्चर्यचकीत झाले आणि त्यांनी वायव्य बर्माच्या टाँडॉ या गावामधून ९ मे रोजी माघार घेण्यास सुरुवात केली. त्याचठिकाणी गुरुंग यांची बटालियन या जापानी सैनिकांची वाट बघत होते. १२ मे ची ती मध्यरात्र होती. आठव्या गुरखा रायफलच्या चौथ्या बलाटियनमधील अनेक सैनिक झोपी गेले होते. रायफल मॅन लाछिमन गुरुंग हे त्यावेळी पहारा देण्याचं काम करत होते. त्यावेळी ते आपल्या एका लहानशा तुकडीसह गावापासून काही अंतरावर होते. इतर गुरखा दुसरीकडे होते. नेमका त्याचवेळी जपानी सैन्यानं हल्ला केला. जवळपास २०० जपानी सैनिकांनी टाँगडॉच्या दिशेनं हल्ला केला. मात्र, ते करण्यासाठी सर्वात आधी त्यांना लाछीमान यांच्या गटाचा सामना करावा लागणार होता.

आलेले ग्रेणेड शत्रूंच्या दिशेनं भिराकवले अन्...

जपानी सैनिकांनी लाछीमान असलेल्या गटाकडे एक ग्रेनेड फेकला. पण, तो हल्ला स्वतःवर ओढवून घेईल तो लाछिमान कसला. त्यांनी क्षणार्धात उडी मारत तो ग्रेनेड पकडला आणि जपानी सैनिकांच्या दिशेनं भिकावला. त्याचा धमका होताच दुसरा ग्रेणेड हा त्याच्या पायाजवळ पडला. पण लाछिमनने तो देखील जपानी सैनिकांच्या दिशेनं फेकला. तिसरा ग्रेणेड हा ते असलेल्या खाईच्या बाहेरच पडला. त्यालाही उचलून जपानी सैनिकांच्या दिशेनं भिरकाविण्याचा प्रयत्न लाछीमनने केला. पण नशिबानं साथ दिली आणि त्याचा तिथेच स्फोट झाला. यामध्ये लाछिमन गंभीररित्या जखमी झाला. त्यांचा हात, चेहरा, खांद्यावर जखमा झाल्या होत्या. यामध्ये इतर दोन सैनिक देखील जखमी झाले होते. यामध्ये लाछिमनच्या डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला. तरीही या परिस्थित त्याने गुरखांच्या 'जय महाकाली, आयो महाकाली' हा जयघोष केला. मात्र, या जयघोषामध्ये लाछिमनची साथ देणारं कोणीच उरलं नव्हतं. त्याच्या गटातील काहींचा मृत्यू झाला होता, तर काही गंभीरित्या जखमी झाले होते.

लाछिमान गुरुंग
नेपाळ भूकंपाने हादरले; 5.8 रिश्टर स्केलचा धक्का

एका हातानं चालविली रायफल -

लाछिमानने एक नजर भिरकावली आणि त्याच्या लक्षात आले, की आता आपल्याला एकटं लढण्याशिवाय पर्याय नाही. त्याने उजव्या हातासाठी बनविलेली आपली रायफल डाव्या हाताने लोड केली. कारण उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता. रायफल उजव्या हाताची असल्यामुळे डाव्या हाताने निशाणा साधणे कठीण होते. तरीही लाछिमानने माघार घेतली नाही आणि जपानी सैन्यांवर तुटून पडाल. जपानी सैनिकांकडून होणाऱ्या प्रत्येक हालचाली टीपत त्याने अचूक नेम धरायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्याने तब्बल २०० जपानी सैनिकांना टक्कर दिली. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे लाछिमनला थकवा आला होता. मात्र, इतक्यात गुरखांचा नवीन गट तिथे आला. त्यानंतर गुरखांनी स्वबळावर तीन दिवस आणि दोन रात्र हे युद्ध लढले. लाछिमान यांच्यामुळे इतर गुरखा देखील प्रेरीत झाले होते. हे युद्ध संपल्यानंतर बंकरसमोर जवळपास ८७ जपानी सैनिकांचे मृतदेह पडलेले दिसले, ज्यांना फक्त लाछिमनने ठार केले होते.

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही लाछिमनचा उजवा डोळा आणि उजवा हात वाचविता आला नाही. १९ डिसेंबर १९४५ रोजी त्यांच्या या शौर्याची दखल घेऊन लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ब्रिटनचा सर्वोच्च सैनिकी किताब 'व्हिक्टोरिया क्रॉस' देऊन लाछिमान यांचा सन्मान केला. त्यानंतर ते ब्रिटेनमध्येच स्थायिक झालेत. त्यांच्यासारखेच इतर गुरखांना देखील ब्रिटेनमध्ये स्थायिक होण्याचा अधिकार मिळावा, यासाठी लाछिमनने ब्रिटीश सरकारसोबत लढा दिला. त्यांच्या या लढ्याला यश आल्यानंतर २०१० मध्ये लाछिमनचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com