चीनसाठी हाँगकाँग का आहे महत्त्वाचं? चीनने असं करण्यामागं काय आहे खरं कारण?

How important is Hong Kong to the rest of China?
How important is Hong Kong to the rest of China?

हाँगकाँग : हाँगकाँगचा विशेष दर्जा ही चीनची खरी सल आहे. चीनमधल्या इतर शहरांपेक्षा हाँगकाँग शहर वेगळं आहे. १५० वर्षांपासून ब्रिटीश साम्राज्याचा हिस्सा असणाऱ्या हाँगकाँग बेटाचं हस्तांतर १८४२मध्ये यूकेकडे करण्यात आलं. नंतर चीनने हाँगकाँगचा इतर भागही ब्रिटीशांना ९९ वर्षांसाठी भाड्याने दिला. व्यापारी बंदर म्हणून हाँगकाँग नावारूपाला आलं. उत्पादन केंद्र म्हणून १९५०च्या दशकामध्ये इथल्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चीनच्या मुख्य भूमीतील अस्थिरता, गरीबी आणि छळापासून पळ काढणऱ्या अनेक स्थलांतरित आणि असंतुष्ट लोकांनी इथे आसरा घेतला. त्यानंतर १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला ब्रिटीशांकडील या ९९ वर्षांच्या भाडेकराराचा कालावधी संपण्याचा अवधी जवळ आल्यानंतर ब्रिटन आणि चीनमध्ये बोलणी सुरू झाली. हाँगकाँग चीनकडे परत देण्यात यावं असं चीनच्या कम्युनिस्ट सरकारचं म्हणणं होतं. 'एक देश, दोन प्रणाली' या धोरणाखाली हाँगकाँग चीनकडे १९९७मध्ये परत देण्यात येईल, अशी तडजोड दोन्ही देशांमध्ये १९८४मध्ये केली. यामुळे चीनचा भाग असूनही हाँगकाँगला ५० वर्षं मोठ्या प्रमाणात स्वायत्तता मिळणार होती. फक्त परराष्ट्र आणि संरक्षण विषयक मुद्दे सोडून इतर सर्व बाबींची स्वायत्तता हाँगकाँगकडे देण्यात आली होती. परिणामी हाँगकाँगचे स्वतःचे कायदे आहेत, सीमारेषा आहेत. लोकांना एकत्र येण्याचा आणि आपलं म्हणणं खुलेपणाने मांडण्याचा अधिकार आहे. हे चीनमध्ये मात्र चालत नाही.
------
चीनसाठी महत्वाचे असणाऱ्या हाँगकाँगचा काय आहे इतिहास?
------
चीनच्या मुख्य भूमीमध्ये पहायला न मिळणारं स्वातंत्र्य हाँगकाँगमध्ये अजूनही असलं तरी हे प्रमाण घसरत असल्याचं बोलले जात आहे. हाँगकाँगवर चीनला संपूर्ण ताबा हवा आहे आणि त्यांना मिळालेल्या विषेशाधिकारामुळे तो मिळत नाही. २८ वर्षांनी म्हणजे २०४७मध्ये हा 'बेसिक लॉ' संपुष्टात येईल. आणि त्यानंतर हाँगकाँगच्या स्वायत्ततेचं काय होणार हे अजूनही स्पष्ट नाही. हाँगकाँगमधले बहुतेक लोक हे चीनी वंशाचे आहेत. आणि हाँगकाँग जरी चीनचा भाग असला तरी बहुतेक लोक स्वतःला चीनी मानत नाहीत. हा मुद्दाही चीनला अडचणीचा वाटत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगने केलेल्या एका पाहणीनुसार बहुतेक लोक स्वतःला 'हाँगकाँगर' म्हणवतात. फक्त ११ टक्के लोक स्वतःला 'चायनीज' समजतात आणि ७१% लोकांना चीनी नागरिक असल्याचा अभिमान वाटत नाही. मुख्यतः तरुणांमध्ये ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते.
--------
योगी सरकारचे घुमजाव; कामगार नेण्यासाठी परवानगीची गरज नाही
--------
गुगलचा मोठा निर्णय; भारतातील 'या' टेलिकॉम कंपनीत करणार गुंतवणूक
--------
व्यक्ती जितकी तरूण तितका त्या व्यक्तीला चीनचा नागरिक असल्याचा अभिमान कमी आहे. शिवाय चीन सरकारच्या हाँगकाँगविषयीच्या धोरणांविषयी तरूणांच्या मनात जास्त नकारात्मक भावना आहे असल्याचे युनिव्हर्सिटीच्या पाहणीत म्हटलं आहे. काही तरूण आंदोलकांनी तर चीनपासून हाँगकाँग स्वतंत्र करण्याविषयी बोलून दाखवले आहे. या मागणीने चीन सरकार खडबडून जागं झालं आहे. चीनपासून हाँगकाँग लांब जात असल्याचे चीन सरकारच्या लक्षात आले असून या कारणाने चीन सरकार हतबल होत चालले आहे. अशात प्रत्यार्पण विधेयक जर मंजूर झालं तर हाँगकाँग पूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली येईल, असं चीन सरकारला वाटत असल्याने प्रत्यार्पम विधेयक मंजूर करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. जर हे विधेयक मंजूर झालं तर मग हाँगकाँगही चीनमधल्याच इतर कोणत्यातरी शहरासारखं होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com