गुगलचा मोठा निर्णय; भारतातील 'या' टेलिकॉम कंपनीत करणार गुंतवणूक

Google Considering Buying Stake in Vodafone Idea
Google Considering Buying Stake in Vodafone Idea

नवी दिल्ली : गुगलने एक मोठा निर्णय घेतला असून एजीआरच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीत गुगल गुंतवणूक करणार आहे. गुगल ही कंपनी व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीचा काही हिस्सा विकत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गुगल व्होडाफोन आयडिया या कंपनीतील ५ टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे. युनायटेड किंगडममधील व्होडाफोन आणि आदित्या बिर्ला यांच्या जॉइंट व्हेन्चर व्होडाफोन आयडिया या कंपनीतील ५ टक्के हिस्सा गुगल खरेदी करण्याची शक्यता असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
------------
आरबीआय बॉँड्समध्ये गुंतवणूक करायची आहे? मग ही आहे शेवटची संधी...
------------
सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
------------
...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
------------
२०१८ मध्ये युकेतील व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समुहाची आयडिया या कंपन्या एकत्र आल्या होत्या. दोन्ही कंपन्यांच्या मर्जरनंतर व्होडाफोन आयडिया ही कंपनी तयार झाली. यामध्ये व्होडाफोनचा ४५ टक्के हिस्सा आहे. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी दूरसंचार विभागानं व्होडाफोन आयडिया या कंपनीला एजीआरची ५८ हजार कोटी रूपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी कंपनीनं ६ हजार ८५४ कोटी रूपयांच्या रकमेचा भरणा केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोलताना आदित्य बिर्ला यांनी सरकारकडून मदत न मिळाल्यास आम्हाला नाईलाजानं कंपनी बंद करावी लागेल, असे म्हटले होतं. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आणखी काही कंपन्यांनीदेखील जिओमध्ये गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता गुगलनेही भारतातील टेलिकॉम क्षेत्रात रस दाखवला असल्याचे यातून दिसत आहे. तसेच, याव्यतिरिक्त गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटही जिओ या टेलिकॉम कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com