Google एका सेकंदाला किती कमावतो?

गुगल एका सेकंदात किती कमावतो, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
google
googlesakal

आज गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झालाय. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही बसून तुम्ही गुगलच्या माध्यमातून हवी ती माहिती घेऊ शकता. गुगलने माणसाचं जीवन सुसह्य केलंय पण तुम्हाला माहिती आहे का? गुगल एका सेकंदात किती कमावतो? तुम्हाला ऐकून धक्का बसेल. (how much google earn in one second read story )

google
Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या

गुगल हे सर्वात जुने असलेल्या सर्च इंजिन पैकी आहे. हे सर्च इंजिन आधी “बेकरब” या नावाने ओळखले जायचे. त्यानंतर 1996 पासून त्याला Google या नावाने ओळखले जाऊ लागले. आज गुगलहे जगातील सर्वात मोठं आणि पहिल्या क्रमांकाचं सर्च इंजिन आहे

Google एका सेकंदाला किती कमावतो?

जगभरात एकाच वेळी लाखो लोक गुगलवर काही ना काही सर्च करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की गुगल एका सेंकदात किती कमावतो? गुगलची एका सेकंदाची कमाई सुमारे $807 आहे म्हणजेच भारतीय चलनांनुसार ही किंमत 59 हजार 607 रुपये आहे. म्हणजेच Google एका मिनिटाला 35 लाख 76 हजार 420 रुपये कमाई करतो.

google
Google Tool : गुगलचं नवं टूल, आता काढू शकता सर्चमधून वैयक्तिक माहिती

येत्या काळात गुगलने बरीच प्रगती केली आहे. यूट्यूब, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम, गुगल मॅप, जी मेल, गुगल म्युझिक आणि व्हिडिओ प्लेअर, गुगल पे, डिजिटल वेलबिंग आणि कॅलक्युलेटर इत्यादी. यामुळे दैनंदिन जीवनात गुगलचे महत्त्व आणखी वाढले.

२०१५ मध्ये सुंदर पिचाई गुगलेच मुख्य कार्यकारी बनविण्यात आले. त्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे २४ ऑक्टोबर २०१५ला पिचाई यांच्यावर अल्फाबेट इन्कॉर्पोरेशनची जबाबदारी देण्यात आली. २०१७ मध्ये तर पिचाई यांची नियुक्ती अल्फाबेटच्या संचालक मंडळातदेखील करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com