Business Success Story : दुकान साफ करण्यापासून सर्वकाही केलं आणि आज जपानमधला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला!

आज त्यांची संपत्ती ३६.९ बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.
Tadashi Yanai Narendra Mdoi
Tadashi Yanai Narendra MdoiSakal

३६.९ बिलियन डॉलर्स इतक्या संपत्तीसह (फोर्ब्सनुसार), तादाशी यानाई सध्या जपानमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ते फास्ट रिटेलिंगचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत, Uniqlo हा कपड्यांचा ब्रँड त्यांनी बनवला आहे.

७४ वर्षीय यानाई यांना Uniqlo ला जगातला सर्वात मोठा कपड्यांचा ब्रँड बनवायचा आहे, तसंच झारा आणि एच अँड एमलाही मागे टाकायचं आहे. या व्यवसायाची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झाली. नैऋत्य जपानच्या यामागुची प्रांतातील उबे या छोट्याशा गावात त्याच्या वडिलांच्या मालकीच्या पुरुषांच्या कपड्यांच्या दुकानात काम करताना हा व्यवसायाची कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत होती.

सुरुवातीची काही वर्षे यानाई यांच्यासाठी खूप अवघड गेली. अगदी दुकानाच्या साफसफाईपासून सर्वकाही स्वतःलाच करावं लागलं असल्याचं त्यांनी सांगितलं. हीच आपल्यासाठी शिकण्याची खूप मोठी संधी होती, असंही यानाई म्हणाले.

Tadashi Yanai Narendra Mdoi
Business Success Story : श्रीमंतांच्या स्टारबक्सचा मालक चक्क एकेकाळी रक्तदान करून पैसे जमवायचा !

१९८४ मध्ये, यानाई यांनी जपानच्या हिरोशिमा येथे Uniqlo चे पहिले स्टोअर उघडले. त्याच्याकडे मोठ्या कल्पना आणि (फॅशन) जागतिक वर्चस्वासाठी आणखी एक मोठी योजना होती. बेनेटन, गॅप आणि एस्प्रिट यांसारख्या युरोपियन आणि अमेरिकन ब्रँड्सपासून प्रेरित होऊन त्यांनी कॅज्युअल ड्रेसिंगसोबत सुरुवात केली आणि त्यावरच भर दिला. १९९१ मध्ये, त्यांनी कंपनीचे नाव ओगोरी शोजी वरून बदलून जागतिक स्तरावर ओळखण्यायोग्य फास्ट रिटेलिंग केले.

१९९८ पर्यंत, Uniqlo ची संपूर्ण जपानमध्ये ३०० पेक्षा जास्त दुकाने होती आणि ते नफ्याचे लक्ष्य साध्य करत होते आणि संपूर्ण जपानमध्ये लोकप्रियता मिळवत होते.

Tadashi Yanai Narendra Mdoi
Business Success : कुटुंब संस्कारातून संसाराची घडी अन्‌ व्यवसायात भरारी! नवलखा परिवाराची यशोगाथा

त्याची लोकप्रियता असूनही, ब्रँडने “स्वस्त आणि निकृष्ट” अशी ओळख मिळवली होती. परिस्थिती बदलण्याचा निर्धार करून, यानाई यांनी Uniqlo ची प्रतिमा सुधारण्यासाठी एक मिशन सुरू केले. २००४ मध्ये, कंपनीने कमी किमतीचे, कमी दर्जाचे कपडे बनवणे थांबवण्याची प्रतिज्ञा केली. “चांगले कपडे दिल्याबद्दल मला मोल मिळावे अशी माझी इच्छा आहे,स्वस्त म्हणून ओळखले जाणे दुःखदायक आहे”,असं यानाई त्यावेळी म्हणाले.

इनोव्हेशन हे Uniqlo चे प्राधान्य बनले आहे. प्रत्येक वर्षी, उत्पादने सुधारत गेली. २००५ मध्ये, फास्ट रिटेलिंगने एक होल्डिंग कंपनी संरचना स्वीकारली, ज्यामुळे Uniqlo ही पूर्ण मालकीची उपकंपनी बनली ज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यानाईदेखील होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com