#HowdyModi : अमेरिकेत ह्युस्टनमध्ये मोदी आणि फक्त मोदी!

वृत्तसंस्था
रविवार, 22 सप्टेंबर 2019

ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी काल (ता. 21) रात्री येथे आगमन झाले. येथे आज आयोजित केलेल्या बहुचर्चित 'हाउडी, मोदी' कार्यक्रमाच्या पार्श्वदभूमीवर मोदींनीही 'हाउडी, ह्युस्टन' असे ट्‌विट करत टेक्साासवासियांना अभिवादन केले.

'हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत होणारे भाषण हे पंतप्रधान मोदींच्या या अमेरिका दौऱ्याचे वैशिष्ट्य आहे. याशिवायही मोदींचा हा दौरा भरगच्च कार्यक्रमांनी आखलेला आहे.

ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी काल (ता. 21) रात्री येथे आगमन झाले. येथे आज आयोजित केलेल्या बहुचर्चित 'हाउडी, मोदी' कार्यक्रमाच्या पार्श्वदभूमीवर मोदींनीही 'हाउडी, ह्युस्टन' असे ट्‌विट करत टेक्साासवासियांना अभिवादन केले.

'हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत होणारे भाषण हे पंतप्रधान मोदींच्या या अमेरिका दौऱ्याचे वैशिष्ट्य आहे. याशिवायही मोदींचा हा दौरा भरगच्च कार्यक्रमांनी आखलेला आहे.

ह्युस्टन येथील विमानतळावर भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रींगला आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनी मोदी यांचे स्वागत केले. अमेरिकेतील भारतीयांनी मोदींचे जोरदार स्वागत केले असून ह्युस्टन शहरात आज, मोदी आणि फक्त मोदींचीच चर्चा आहे. 

काय घडले पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात?

  1. अमेरिकेतील तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर पंतप्रधान मोदींची चर्चा. 
  2. भारताची ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेता या क्षेत्रातील संधींबाबत चर्चा. बैठकीत ऊर्जा सुरक्षा आणि गुंतवणुकीच्या संधींबाबतही चर्चा झाली
  3. बैठकीला 17 जागतिक कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. या कंपन्यांचा 150 देशांमध्ये व्यवसाय
  4. काळ्या यादीतून तीनशेहून अधिक शीख नागरिकांची नावे काढून टाकल्याबद्दल अमेरिकेतील शीख नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार
  5. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या काश्मिरी पंडितांची घेतली भेट
  6. तुम्ही खूप सहन केले, आता नवा काश्मीर घडवू; पंतप्रधान मोदींचा काश्मिरी पंडितांना शब्द
  7. बोहरा समाजाच्या नागरिकांनीही घेतली; पंतप्रधान मोदींची घेतली भेट 
  8. 'हाउडी, मोदी' कार्यक्रम झालेल्या एनआरजी स्टेडियमबाहेर सिंधी, बलुच आणि पश्तून समुदायाच्या लोकांची पाकिस्तानविरोधात निदर्शने.
  9. पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांची पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याची मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती

सोशल मीडियावर मोदींचे कौतुक
स्वच्छता अभियानाद्वारे देशातील नागरिकांपर्यंत महात्मा गांधीजींचा स्वच्छतेचा संदेश पोचविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:देखील या संदेशाचे पालन करतात, हे त्यांनी आज सिद्ध केले.

येथील विमानतळावर उतरताच अमेरिकेच्या शिष्टमंडळाने त्यांचे स्वागत करताना त्यांच्या हातात फुलांचा गुच्छ दिला. या वेळी या गुच्छातील एक फूल जमिनीवर पडले. मोदींनी तत्काळ ते फूल उचलून सहकाऱ्याकडे दिले. त्यांच्या या समयसूचकतेचे उपस्थितांना आश्चर्य वाटलेच; पण सोशल मीडियावरही मोदींचे कौतुक झाले. भारतात स्वच्छता अभियान राबवीत असल्याबद्दल मोदींना याच दौऱ्यादरम्यान 'ग्लोबल गोलकिपर' पुरस्कार दिला जाणार आहे.

- जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुलने घडवला इतिहास; ठरला पहिला महाराष्ट्रीयन मल्ल!

- Video:..म्हणून काश्मीरमध्ये तिरंग्याचा सन्मान वाढला : मुख्यमंत्री

- ‘हे बरं नव्हं’; साताऱ्यात पवारांचा उदयनराजेंना टोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modis mega event Howdy Modi kicks off as Indian diaspora paint houston stadium saffron