
नवी दिल्ली : वातावरणात सातत्यानं बदल होत असून त्याचे परिणाम म्हणून भीषण अपत्ती ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा मानवी जीवन आणि उपजीविकेवर मोठा परिणाम होणार आहे. येत्या ८ वर्षात अर्थात सन २०३० पर्यंत या अधिकाधिक कठीण परिस्थितीला मनुष्याला समोरं जावं लागेल, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटलं आहे. (Humans could suffer 560 catastrophic disasters every year by 2030 UN report)
युएनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, "जर आत्ताचा ट्रेंड कायमच दुर्लक्ष राहिलं तर जगाला सन २०३० पर्यंत दरवर्षी ५६० प्रकारच्या भीषण आपत्तींना तोंड द्यावं लागेल. सन २०१५ मध्ये अशा प्रकारे ४०० हून अधिक आपत्तींना मानवाला तोंड द्यावं लागलं होतं. यांपैकी बहुतांश आपत्ती या हवामानविषयक असतील. उदा. आग आणि पूर तसेच महामारी आणि रासायनिक अपघात यांचाही यामध्ये समावेश असेल"
वातावरण बदलामुळं हवामानाशी संबंधीत धोकादायक परिमाण, वारंवारता, कालावधी आणि तीव्रता वाढत आहेत. मोठ्या आपत्तींसाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत हे आपत्ती, हानी आणि विकासातील अडथळ्यांचे प्रमुख चालक बनलं आहे. युएनच्या या वैज्ञानिक अहवालात असंही म्हटलंय की, सन 1970 ते 2000 पर्यंत जगाला वर्षाला फक्त 90 ते 100 मध्यम ते मोठ्या प्रमाणात आपत्तींचा सामना करावा लागला होता.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, युएनच्या डेप्युटी सेक्रिटरी-जनरल अमिना जे मोहम्मद यांनी हा अहवाल न्यूयॉर्कमधील युएनच्या मुख्यालयात सादर केला. आपत्तींमधील धोक्यांचा मुकाबला कसा करायचा हे देखील आपल्याला आता शिकावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.