टेस्लाचे भारतात स्वागत; पण, "मेक इन चायना चालणार नाही : गडकरी | Tesla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

टेस्लाचे भारतात स्वागत; पण, "मेक इन चायना चालणार नाही : गडकरी

नवी दिल्ली : टेस्लाने (Tesla) भारतात कारखाने सुरू करणे, विक्रीसाठी कार तयार करणे आणि निर्यात करणे हे स्वागतार्ह आहे, परंतु टेस्लाने चीनमधून (China) कार आयात करू नये, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी सांगितले. "मेक इन चायना आणि भारतात विक्री'' हा चांगला प्रस्ताव नाही." असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. (Nitin Gadakari On Tesla Car)

टेस्ला कंपनी त्यांची वाहने (CAR) भारतात आयात करून विकण्यास उत्सुक आहे. यासाठी टेस्लाने आयात शुल्कात कपात करण्यासाठी जवळपास वर्षभर दिल्लीतील अधिकाऱ्यांशी लॉबिंग केले होते. तर, दुसरीकडे भारतातील दर जगातील सर्वाधिक असल्याचे विधान मस्क यांनी यापूर्वीच केले आहे. तसेच टेस्लाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मेक इन इंडिया" च्या अनुषंगाने भारतात उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी भारतातील त्यांच्या गुंतवणूक योजनेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

मस्क यांना भारत सरकारने टेस्लाच्या कारवरील आयात शुल्क कमी करावे असे वाटते, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र, मस्क यांच्या या मागणीला भारत सरकार तयार नसून, मस्क यांच्या दबावाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: 6 ते 12 वर्षांच्या मुलांचा लसीकरणाचा मार्ग मोकळा; DGCI ची परवानगी

आधी मेक इन इंडिया मग डिस्काउंटबद्दल बोला

टेस्ला भारतात कार बनवण्याऐवजी येथे आयात केलेल्या कार विकू इच्छित आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिक कारवरील (Electric Car) आयात शुल्क कमी करावे, असे टेस्लाने अनेक मंचांवर म्हटले आहे. तथापि, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला कडक शब्दात सांगितले आहे की, टेस्ला भारतात येईल आणि आधी कार बनवेल, त्यानंतर सवलतींचा विचार केला जाईल.

Web Title: Tesla Welcome But Shouldnt Import From China To Sell Here Says Nitin Gadkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top