कारागृहातून मुलाला पळविण्यासाठी आईने खोदले भुयार पण...

वृत्तसंस्था
Tuesday, 4 August 2020

कारागृहामधून पळून जाण्यासाठी कैदी भुयार खोदून त्यामधून पसार होत असल्याचे चित्रपटांमधून पाहायला मिळते. पण, एका आईने आपल्या मुलाला कारागृहातून पळविण्यासाठी स्वतः भुयार खोदायला सुरवात केली.

युक्रेन: कारागृहामधून पळून जाण्यासाठी कैदी भुयार खोदून त्यामधून पसार होत असल्याचे चित्रपटांमधून पाहायला मिळते. पण, एका आईने आपल्या मुलाला कारागृहातून पळविण्यासाठी स्वतः भुयार खोदायला सुरवात केली. पण, पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही आणि तिलाही कारागृहात जाण्याची वेळ आली.

'तो' कॅमेराकडे फक्त 2 तास बघत बसला अन्...

५१ वर्षीय महिलेने मुलाला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी नियोजन केले होते. कारागृहाजवळ असलेल्या जपोरिझिआ परिसरात भाड्याने घर घेतले होते. महिलेने कुदळ आणि फावडे घेऊन खोदकाम सुरू केले होते. काही दिवसांतच तिने 10 फूट भुयारी मार्ग तयार केला. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ती केवळ रात्री खोदकाम करत होती. तसेच या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती आवाज न येणाऱ्या स्कूटरचा वापर करत होती. मुलाला सोडवण्यासाठी तिला साधारण ३५ फूट खोदकाम करायचे होते. महिलेने जवळपास 3 आठवडे खोदकाम करत 3 टन माती काढली होती.

कोरोनामुळे लाखोंच्या नोटा वॉशिंगमशीनमध्ये धुतल्या अन्...

स्थानिकांनी ओळखू नये किंवा कोणाला संशय येऊ नये म्हणून महिला संपूर्ण दिवस घरातच असायची. अधांर पडू लागला की स्कूटरवरून भुयारी मार्गाच्या ठिकाणी पोहचायची आणि खोदकाम सुरू करायची. दहा फूट भूयार तयार करून झाले होते. पण, पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही आणि पोलिसांनी तिला पकडले. दरम्यान, तिने तयार केलेले भुयार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सन प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काहींनी टीका केली आहे तर काही जण कौतुकही करत आहेत.

चॅलेंज! फोटोमध्ये कुत्र्याला शोधून दाखवाच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother dug tunnel by hand attempt break son jail at ukraine

Tags
टॉपिकस
Topic Tags: