esakal | फोटोग्राफरला लग्नात मिळालं नाही जेवण; नवरदेवासमोरच डिलिट केले लग्नाचे फोटो!
sakal

बोलून बातमी शोधा

Photographer

फोटोग्राफरला लग्नात मिळालं नाही जेवण; नवरदेवासमोरच डिलिट केले लग्नाचे फोटो

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लग्न समारंभ आणि त्याचे फोटो हा आपल्यासाठी अमुल्य ठेवा असतो. लग्नाचे सुंदर क्षण कायम स्मरणात रहावेत यासाठी चांगल्यातला चांगला फोटोग्राफर आपण निवडतो. तसेच लग्नाचा अल्बमही आकर्षक व्हावा यासाठी चांगले पैसे मोजतो. पण जर असे लग्नाचे फोटो फोटोग्राफरकडून डिलिट झाले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? असाच एक खळबळजनक किस्सा सोशल मीडियात व्हायरल झालाय. फोटोग्राफरला लग्नात जेवण मिळालं नसल्याने त्यानं चक्क नवरदेवासमोरचं लग्नाचे सर्व फोटो डिलीट करुन टाकले. तसेच त्यानं आपल्या या कृतीबाबत सोशल मीडियावर लोकांची मतंही विचारली.

हेही वाचा: राज ठाकरे यांच्या ई-मेलला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर

या फोटोग्राफरनं या घटनेबाबत सांगताना रेडिटवर लिहिलं की, "मी खरोखर फोटोग्राफर नाही, मी एक कुत्रापालक आहे. मी माझ्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी दिवसभर कुत्र्यांचे बरेच फोटो काढतो. माझ्या मित्राने पैसे वाचवण्यासाठी मला आपल्या लग्नाचे फोटो काढण्यासाठी तयार केले होते. मी त्याला सांगितलं की, "फोटो काढणं हे माझं कौशल्य नाही पण तो म्हणाला, तू परिपूर्ण फोटोग्राफर नसलास तरी मला हरकत नाही." यानंतर मी 250 डॉलरमध्ये त्याच्या लग्नाचे फोटो काढण्यास तयार झालो. मी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काम सुरू केलं जे संध्याकाळी ७.३०च्या सुमारास संपणार होतं. दरम्यान, संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, भोजन समारंभ होता. पण मला सांगण्यात आलं की, "मी आत्ताच जेवू शकत नाही कारण फोटो काढणे गरजेचे आहे" त्यांनी मला जेवणासाठी टेबलवर जागाही शिल्लक ठेवली नाही."

हेही वाचा: वारंवार रस्ते कसे अडवले जाऊ शकतात? SCचा केंद्राला सवाल

फोटोग्राफरनं आपल्या नवरदेव मित्राला सांगितलं की, "मी कंटाळलो आहे आणि याक्षणी काही केल्या मी हे काम करु शकत नाही. तसेच लग्नाचा हॉलमध्ये खूपच उकडत होते, तिथलं तापमान जवळपास 110F इतकं होतं तिथे साधा एसीही नव्हता. यात भर म्हणजे तिथं पिण्यासाठी पाणी मिळण्याचीही सोय नव्हती. त्यानंतर त्याने नवऱ्याला सांगितलं की, त्याला काहीतरी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी वीस मिनिटांच्या विश्रांतीची आवश्यकता आहे. पण, नवरदेवानं त्याला सांगितले की "मला सध्या फोटोग्राफर इथं असणं गरजेचं आहे किंवा तुला जायचचं असेल तर तुला कामाचे पैसे मिळणार नाहीत."

हेही वाचा: ऑफलाइन शाळांचा निर्णय पालकांची संमतिपत्रे ठरवणार

फोटोग्राफर पुढे म्हणाला, "उकाड्यामुळं मला खूपच भूक लागली होती. त्यामुळे माझी चिडचिडही होत होती. मी पुन्हा एकदा नवरदेवाला विचारलं की मी पैसे न घेताच जावं असं तुला खरंच वाटतंय का? त्यावर तो हो म्हणाला! यानंतर मला खूपच राग आला आणइ मी त्याच्या समोरच माझ्या कॅमेरॅत काढलेले सर्व फोटो डिलिट करुन टाकले. यानंतर जेव्हा हे नवविवाहित जोडपं त्यांच्या हनीमूनला गेले आणि सोशल मीडियापासून दूर होते. तेव्हा लोक त्यांना लग्नाच्या फोटोंबद्दल विचारत होते, असंही या फोटोग्राफरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या फोटोग्राफरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून फोटोग्राफरनं केलेल्या कृत्याला अनेकांनी पाठींबा दर्शवला आहे. एक युजर म्हणाला की, त्यानं तुला कमी पैशात काम करुन घेतलं आणि जेवणही दिलं नाही. उलट पाळीव कुत्री देखील कधीही अशा मित्रांपेक्षा चांगली असतात.

loading image
go to top