Libya Flood : लीबियात पूरबळींची संख्या पाच हजारांवर

लीबियामध्ये पुरात वाहून गेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५,१०० झाली आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असा अंदाज सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला
hunt for libya flood victims continues as death toll rises past 5000
hunt for libya flood victims continues as death toll rises past 5000sakal

डेर्ना (लीबिया) : लीबियामध्ये पुरात वाहून गेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५,१०० झाली आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असा अंदाज सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डॅनिएल’ या वादळामुळे सोमवारी (ता. ११) रात्री लीबियाच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर नद्यांना पूर आले होते.

पाण्याचा जोर वाढून दोन धरणे फुटल्याने किनारपट्टीवरील डेर्ना या गावात पाण्याचा प्रचंड लोंढा शिरला. यात शेकडो जण वाहून गेले. पाणी समुद्रात निघून गेल्यानंतर गावातील चिखलातून कालपर्यंत (ता. १२) सातशे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. आज या मृतांची संख्या पाच हजारांच्या वर गेली आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे तीस हजारांहून अधिक विस्थापित झाले आहेत. इजिप्तसह काही देशांनी लीबियामध्ये बचावपथके पाठविली आहेत. अनेक वर्षांच्या अराजकतेमुळे पूर्व लीबियामध्ये नियोजनशून्य कारभार असून त्यामुळे हानीमध्ये भर पडत असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. डेर्ना शहराला जोडणाऱ्या सात प्रमुख रस्त्यांपैकी पाच रस्ते पूर्णपणे वाहून गेल्याने आणि नदीवरील पूलही कोसळल्याने मदत पोहोचविण्यात अडथळे येत आहेत.

ग्रीसलाही दणका

लीबियाला धडक देण्याआधी डॅनिएल वादळाने मध्य समुद्राच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ग्रीसलाही तडाखा दिला होता. हे वादळ पाच आणि सहा सप्टेंबरला ग्रीसला धडकले होते. यामुळे ग्रीसच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळून शेती, जंगले आणि शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागांत २४ तासांमध्ये ७५० मिमी इतका प्रचंड पाऊस कोसळल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com