नवऱ्यासाठी नव्हे तर... वजनदार पत्नी स्लिम झाली; अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china women

नवऱ्यासाठी नव्हे तर... वजनदार पत्नी स्लिम झाली; अन्...

पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी नवरोबा कायमच धडपडत असतो. हे फक्त आपल्याकडेच होतं असं नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात प्रथा आणि प्रांत बदलतो बाकी "तुमचं आमचं सेम असतं" असाच काहीसा सीन सगळीकडे दिसतो. बहुतांश महिलांना दागिण्याची आवडं असते आणि या आवडीसाठी त्या सवड काढून कोणतीही गोष्ट सहज आणि प्रामाणिकपणे करतातही. एका महिलेनं अशक्यप्राय गोष्ट करुन दाखवून आपल्या पतीला सरप्राइज दिले. (Women Weight Loss)

पतीची इच्छा अन् गिफ्ट

चीनी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, तायवानचच्या एका व्यक्तीने 3 जानेवारीला एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. यात त्याने लिहिलंय की, 'दोन वर्षांपूर्वी पत्नी मला बर्थ डे गिफ्ट काय देऊ? असा प्रश्न विचारला होता. सुरुवातीला मी तिला रिप्लाय दिला नाही. पण थोड्या वेळाने मी तिला एकदा वजन कमी करुन दाखवं असं म्हटले. जर तू हे करुन दाखवलेस तर 1 कॅरेट हिरा गिफ्ट देईन. पण यासाठी तू वजन 55 किलोच्या आसपास आणायला हवेस, असे सांगितले होते.

हेही वाचा: होनोलुलुतील पर्ल हार्बर संग्रहालय

चीनमध्ये (China) एका महिलने 75 किलो वजन कमी करुन दाखवलं आहे. पतीने दिलेले चॅलेंज स्विकारून पठ्ठीनं 130 किलोवरुन आपले वजन 55 किलोवर आणले. पत्नीने वजन कमी केल्यानंतर पती आनंदी झाला आणि त्याने तिला मौल्यवान गिफ्टही दिलं.

हेही वाचा: कामावर झालेल्या लैंगिक छळाची चौकशी सार्वजनिक करणार - Global IT

हिऱ्यासाठी की नवऱ्यासाठी ते तिलाच माहित पण बाईनं करुन दाखवलं.

अशक्यप्राय वाटणारी गोष्ट या महिलेनं दोन वर्षात करुन दाखवली. पहिल्यांदा तिचे वजन 130 किलोग्राम होते. सध्याला तिचे वजन 55 किलो आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा पहिला फोटो आणि सध्याचा फोटो शेअर करुन आपला आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या पोस्टवर अक्षरक्ष: प्रतिक्रियांची बरसात होताना दिसते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top