esakal | दारूड्याने नशेत काय प्रताप केला पाहा...
sakal

बोलून बातमी शोधा

drunk man inserts glass bottle into body through anus, surgically removed in tn

लॉकडाऊनदरम्यान सरकारने दारु विक्रीसाठी दुकानांना परवानगी दिली. तळीरामांना अनेक दिवसानंतर दारू मिळू लागल्यानंतर त्यांचे प्रताप पुढे येऊ लागले आहेत. एका दारुड्याने तर नशेत गुदद्वारे दारूची बाटली पोटात घातली.

दारूड्याने नशेत काय प्रताप केला पाहा...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चेन्नई: लॉकडाऊनदरम्यान सरकारने दारु विक्रीसाठी दुकानांना परवानगी दिली. तळीरामांना अनेक दिवसानंतर दारू मिळू लागल्यानंतर त्यांचे प्रताप पुढे येऊ लागले आहेत. एका दारुड्याने तर नशेत गुदद्वारे दारूची बाटली पोटात घातली. पण, त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मंत्र्याला कोरोना अन् मंत्रीमंडळ होम क्वारंटाइन...

लॉकडाउनदरम्यान तळीरामांच्या अनेक विचित्र घटना समोर आल्या. तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या पोटातून चक्क दारूची बाटली काढण्यात आली. पोटात दारुची बाटली पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.

...म्हणून नर्सने पाजलं नवजात बाळाला दूध

एक 29 वर्षीय व्यक्तीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. कुटुंबियांनी त्याला नागापट्टिनम सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण, त्याच्या पोटामध्ये दारूची बाटली होती. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून बाटली काढण्याचे ठरवले. शुक्रवारी दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर या व्यक्तीच्या पोटातून दारूची बॉटल काढण्यात डॉक्टरांना यश आले. दरम्यान, 'नशेत असताना गुददद्वारे बाटली पोटात घातल्याचे दारुड्याने शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांना सांगितले.

loading image
go to top