
``पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार महिला विरोधी आहे. इम्रान खान इतके घाबरट आहेत की त्यांनी मी तुरुंगात असताना स्वच्छतागृहातही छुपे कॅमेरे लावले होते,`` असा आरोप मरियम शरीफ यांनी जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
इस्लामाबाद - मला तुरुंगात डांबल्यानंतरही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत होती. इतकेच नव्हे तर स्वच्छतागृहातही छुपे कॅमेरे बसविण्यात आले होते, असा आरोप नवाज शरीफ यांच्या कन्या मरियन शरीफ यांनी आज केला.
पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज गट) पक्षाच्या मरियम या उपाध्यक्ष आहेत. गेल्यावर्षी त्यांना चौधरी साखर कारखान्यातील गैरव्यवहारांबद्दल अटक करण्यात आली होती. ``पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार महिला विरोधी आहे. इम्रान खान इतके घाबरट आहेत की त्यांनी मी तुरुंगात असताना स्वच्छतागृहातही छुपे कॅमेरे लावले होते,`` असा आरोप मरियम शरीफ यांनी जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्या म्हणाल्या, ``मी दोनदा तुरुंगात केले. या काळात महिला म्हणून मला मिळालेली वागणूक अत्यांत घृणास्पह होती. एका पक्षाच्या उपाध्यक्ष असलेल्या महिलेला तिच्या घरी येऊन वडिलांसमोर अटक करण्यात येत असेल, तर देशातील एकही महिला सुरक्षित नाही, असेच म्हणावे लागेल. पाकिस्तान असो किंवा इतर कोणताही देश असो महिला कमकुवत नाहीत, हे इम्राम खान सरकारने विसरू नये``
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जर मरियम नवाज यांच्या घराचादरवाजा तोडला जाऊ शकतो, खरे बोलण्याबद्दल अटक केली जाऊ शकते, तर अशा स्थितीत पाकिस्तानातील महिला सुरक्षित आहेत, असे कसे म्हणला येईल?
- मरियम शरीफ, पाकिस्तानी नेत्या