जीन्स घालाल, विदेशी फिल्म्स पहाल तर 'ढिशक्यांव'; किम जोंग उनचा नवा फतवा

जीन्स घालाल, विदेशी फिल्म्स पहाल तर 'ढिशक्यांव'; किम जोंग उनचा नवा फतवा

सोल : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आपल्या सनकी निर्णयांसाठी ओळखला जातो. जगभरात त्याच्या या निर्णयांबाबत उत्सुकता तसेच भीती देखील असते. असाच काहीसा एक निर्णय पुन्हा एकदा किम जोंग उनने आता घेतला आहे. किम जोंग उनने एक नवा फतवा काढत म्हटलंय की, जर उत्तर कोरियाच्या एखाद्या नागरिकाने परदेशी चित्रपट पाहिले अथवा परदेशी चित्रपट पाहिले तर त्याला मृत्यूदंड ठोठावला जाईल. थोडक्यात, ज्या माध्यामतून कोणत्याही प्रकारच्या विदेशी प्रभाव पडेल, अशा गोष्टी पूर्णपणे टाळण्याचा आदेश देशातील नागरिकांना देण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर, किम जोंग उनने आपल्या या फतव्यात असं देखील म्हटलंय की, जर कुणाजवळ अमेरिकन, जपानी आणि दक्षिण कोरिया या देशातील व्हिडीओ मिळाले तर त्याला देखील मृत्यूची शिक्षा सुनावण्यात येईल. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने अलिकडेच सरकारी मीडियाला याबाबत एक पत्र लिहलंय. या पत्राद्वारे देशातील युवकांना तरुणांमधील अप्रिय, व्यक्तीवादी, असामाजिक वागणूकीविरोधात मोहीम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दक्षिण कोरियाच्या लोकांचं म्हणणं आहे की, किम जोंग उन परदेशी भाषणांना, हेअर स्टाईल्सला आणि कपड्यांना खतरनाक असं विष मानतो. (If Anyone Watch Foreign Movie Will Sentenced To Death North Korea Dictator Kim Jong Un Issued A Notice)

जीन्स घालाल, विदेशी फिल्म्स पहाल तर 'ढिशक्यांव'; किम जोंग उनचा नवा फतवा
अंतराळातून नाही तर महासागरांमधून येताहेत एलियन्स?

कल्पना करा की, ज्या देशात इंटरनेट नाही, सोशल मीडिया नाही आणि देशातील नेते तुम्हाला काय ऐकवू इच्छितात तेवढेच सांगण्यासाठी म्हणून फक्त काही मोजके शासन नियंत्रित टीव्ही चॅनेल आहेत, अशा वातावरणातील नागरिकांची अवस्था काय असेल? मात्र, हेच वास्तव असून उत्तर कोरियामधील लोकांचं जीवन आहे. लोकांचं म्हणणं आहे की, हुकुमशहा किम जोंग उनची अशी इच्छा नाहीये की, त्याच्या देशातील नागरिकांनी दक्षिण कोरियातील झगमगीत टीव्ही सिरियल्स आणि फिल्म्स पहावेत.

जीन्स घालाल, विदेशी फिल्म्स पहाल तर 'ढिशक्यांव'; किम जोंग उनचा नवा फतवा
'हा तर रिअल लाइफ पोपॉय'; तरुणाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत

किम जोंग उन देशातील तरुणांच्या मनात भीती निर्माण करुन त्यांच्या स्वप्नांना मारुन टाकू इच्छित आहे. किमला असं वाटतं की, जर इतर देशाची संस्कृती त्याच्या देशापर्यंत पोहोचली तर देशातील नागरिक त्याच्याविरोधात एकवटू शकतात. असे एकत्र आलेले लोक त्याची हुकूमशाही धोक्यात आणू शकतात. नव्या कायद्यानुसार, जर एखादा कर्मचारी दोषी आढळला तर त्या फॅक्टरीच्या मालकाला शिक्षा केली जाईल. जर एखादा मुलगा परदेशी कपडे अथवा परदेशी हेअर स्टाईल करतक असेल तर त्याच्या माता-पित्यांना शिक्षा केली जाईल. तर दुसरीकडे उत्तर कोरियाच्या लोकांना बाहेरचं जग जाणून घेण्यात, तिथे काय सुरुय हे समजून घेण्यात अधिक रस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com