US Election "निवडणुकीत पराभव झाल्यास मला देश सोडावा लागेल"

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 October 2020

कोरोनातून बरे झालेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे.

वॉशिंग्टन- कोरोनातून बरे झालेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी आपले प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यावर टीका करण्याची एकही संधीही सोडली आहे. त्यातच एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी जर हरलो तर मला चांगलं वाटणार नाही. कदाचीत मला देश सोडावा लागले, मी काय करेन माहिती नाही, असं ते म्हणाले आहेत. 

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आमने सामने आहेत. दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, असं बोललं जातंय. पण विविध सर्वेक्षणामध्ये ज्यो बायडेन आघाडी घेताना दिसत आहेत.  ट्रम्प यांची लोकप्रियता घटली आहे तर बायडेन यांना लोकांची पसंती मिळताना दिसत आहे.

मोठी बातमी! रशियाची कोविड-19 लस मिळणार भारतीयांना

कमला हॅरिस यांची ट्रम्प यांच्यावर टीका

गेल्या चार वर्षात ट्रम्प प्रशासन सर्वंच आघाड्यांवर अपयशी ठरल्यामुळे हवामान बदलाबरोबरच नागरिकांचे आरोग्य, अर्थव्यवस्था, भूकबळी यासह अनेक संकटांचा सामना अमेरिकेला करावा लागत असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी केला आहे. आता यात वर्णभेदाचाही मुद्दा सामील झाला असल्याचे त्या म्हणाल्या.

कोरोना लशीच्या वाटपाची तयारी सुरू; पंतप्रधान मोदींनी केल्या सूचना 

विस्कॉन्सिन येथे देणगी जमा करण्यासाठी शुक्रवारी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना हॅरिस म्हणाल्या, की कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात येऊनही डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. परिणामी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाचा प्रसार झाला. ट्रम्प यांना कोरोनाची भणक २८ जानेवारीलाच लागली होती. हा संसर्ग साधारण तापेच्या तुलनेत पाच पट अधिक घातक आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. एवढेच नाही तर हा संसर्ग हवेतूनही पसरू शकतो आणि मुलांना लागण होऊ शकते याची जाणीवही विद्यमान अध्यक्षांना होती. तरीही अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी आपल्या तोंडावर बोट ठेवले. लोकांना या आजाराची माहिती सांगितली नाही आणि सर्वकाही लपवून ठेवले. ट्रम्प यांना कोविडचा सामना करण्यास अपयश आले आहे. त्यांनी परिस्थितीला योग्य रितीने न हाताळल्याने अमेरिकेची कोरानाची स्थिती हाताबाहेर गेली. त्यांच्या अकार्यक्षमतेचा हा कळस आहे, अशा खरमरीत टीका हॅरिस यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If i loses election Maybe have to leave the country us election