"भारतीय वंशाच्या कमला हॅरिस जिंकल्यास, त्या जो बायडेन यांच्या बॉस होतील"

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून निवडलं आहे. 

वॉशिंग्टन- डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन आणि कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस यांचा निवडणुकीत विजय झाला, तर हॅरिस या बायडेन यांच्या बॉस बनतील, असा दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. माजी उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून निवडलं आहे. 

भारतानंतर अमेरिकेचा चीनला दणका; 38 बड्या कंपन्यांवर बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सभेत बायडेन आणि हॅरिस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. तुम्ही बायडेन आणि त्यांच्या बॉस कमला हॅरिस यांच्या उन्मादी समाजवादी नीतींनी आपल्या अर्थव्यवस्थेला उद्धवस्त करु देऊ पाहात आहात काय, असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी बायडेन यांच्या मानसिक स्थितीचा उल्लेख करत म्हटलं की, ते मानसिकरित्या थकले आहेत. त्यामुळे त्यांच्यात राष्ट्रपती होण्याची क्षमता नाही.

जो बायडेन आता 78 वर्षांचे होतील. राष्ट्रपतीपद सांभाळण्यासाठी हे वय खूप जास्त आहे. ते सर्वाधिक वयाचे राष्ट्रपती होतील, तर कमला हॅरिस 56 वर्षांच्या असतील. त्यामुळे हॅरिस त्यांच्या बॉस होतील, असा दावा ट्रम्प यांनी केला. कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुका लाजे खातर सोडून दिल्या. त्यामुळे त्यांच्या समर्थनातील मतदान संख्या खूप कमी झाली आहे, अशी टाकाही त्यांनी केली. 

WHO म्हणते,'कोरोना व्हॅक्सिनच्या भरोशावर बसू नका, स्वत:ची व्यवस्था बघा...

ट्रम्प यांनी हॅरिस यांना सरासरी दर्जाच्या आणि रागीट महिला असल्याचं म्हटलं आहे. बायडेन यांच्या आजपासचे लोक हुशार आहेत. कोणीही हॅरिस यांच्या इतकं बायडेन यांच्यासोबत वाईट वागलं नाही.  कमला हॅरिस वादविवादात कोणत्याही नेत्यापेक्षा वाईट होत्या. कोणीही बायडेन यांच्यासोबत वाईट व्यवहार केला नाही किंवा त्यांच्या सन्मानात काही कमी केली नाही. मात्र, हॅरिस यांच्या मनात बायडेन यांच्याबाबत कोणताही सन्मान नाही. अचानक त्या बायडेन चांगले असल्याचं म्हणत आहेत. काही काळापूर्वी त्यांना असं वाटत नव्हतं, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. शिवाय बायडेन आणि हॅरिस यांचा विजय झाल्यास अमेरिकेवर चीनचा प्रभाव असेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होत आहे. यात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आमने-सामने आहेत. ट्रम्प यांच्या समोर पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी आहे. मात्र, यावेळी त्यांच्या समोर अनेक अडचणी आहे. शिवाय अनेक सर्वेक्षणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पिछाडी होत असल्याचं दिसत आहे. जो बायडेन यांना लोकांची पसंती मिळत आहे.

(edited by-kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if kamla harris win then she will became boss of joe biden donald trump us election