अमेरिकेशी मैत्री कराल तर जीवे मारु; चीनने तैवानच्या राष्ट्रपतींना दिली उघड धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 21 September 2020

ग्लोबल टाईम्सने तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंगवेन यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

ताईपेई- अमेरिकी परराष्ट्रमंत्री विभागाचे वरिष्ठ अधिकारी कीथ क्राच यांनी काही दिवसांपूर्वी तैवानला भेट दिली होती. यामुळे चीन चांगलाच भडकला असून राज्य वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सने तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंगवेन यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तैवानच्या राष्ट्रपती त्याई यांनी अमेरिकी अधिकाऱ्यासोबत डिनर करुन आगीशी खेळ सुरु केला आहे. त्याई यांच्या पाऊलामुळे चिनी कायद्याचे उल्लंघन झाल्यास युद्ध सुरु होईल आणि तैवानी नेत्याचे अस्तित्व नष्ट केलं जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. 

नौदलाचं ऐतिहासिक पाऊल; युद्धनौकेवर पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात
 

याआधी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अधिकारी क्राच १७ सप्टेंबर रोजी तैवान येथे आले होते, त्यांनी १८ सप्टेंबर रोजी तैवानच्या राष्ट्रपतींसोबत रात्रीचे जेवन केले होते. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाकडून हा वरिष्ठ स्तरावरील दौरा होता. याआधी अमेरिकेचे आरोग्य मंत्री एलेक्स अजार हेही तैवानला आले होते. आता त्याई वेन आणि क्राच यांनी एकत्र जेवन केल्याने चीन चांगलाच भडकला आहे. 

आगीसोबत खेळत आहे तैवान!

तैवान अमेरिकसोबत संबंध मजबूत करुन आगीशी खेळत आहे, असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे. विशेष म्हणजे सध्या चिनी लढाऊ विमाने वारंवार तैवानच्या हद्दीत घुसत आहेत. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी चीनने आपली 19 लढाऊ विमाने चीनच्या हद्दीत पाठवली आहेत. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी क्राच तैवानच्या राजकीय व्यवस्थेमध्ये बदल करणारे माजी राष्ट्रपती तेंग हुई यांना श्रद्धांजली देत होते. 

भारताच्या आघाडीमुळे खवळला चीन, तिबेटमध्ये युद्धसराव करत डागली मिसाईल

शुक्रवारी चीनच्या 19 लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. विशेष म्हणजे या लढाऊ विमानांमध्ये आण्विक बॉम्बरचाही समावेश होता. चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी होताच, तैवानच्या रडारने याबद्दल वॉर्निंग जारी केली होती. तैवाननेही आपली लढाऊ विमाने सज्ज केली आहेत. 

चीनची धमकी

पीएलए युद्धसराव करत आहे. याने तैवान घाबरला पाहिजे. अमेरिकेने क्राच यांच्या तैवान दौऱ्याची अधिकारिक घोषणा केली नव्हती. त्यामुळे त्यांचे स्वागत चीनने युद्धसराव करुन दिला आहे. खूप कमी वेळात आम्ही युद्धासाठी तयार होऊ शकतो, असं ग्लोबल टाईम्सकडून म्हणण्यात आलंय.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you make friends with America you will die China threatens Taiwan president