राम मंदिराच्या भूमिपूजनाची अमेरिकेतही चर्चा; टाईम्स स्क्वेअरवर झळकणार श्रीरामाची प्रतिमा

पीटीआय
शुक्रवार, 31 जुलै 2020

अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची चर्चा अमेरिकेतही आहे. याच दिवशी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथील भव्य फलकावर श्रीरामाचे छायाचित्र आणि अयोध्येतील राम मंदिराची त्रिमितीय प्रतिकृती झळकणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक घटनेच्या सन्मानार्थ हा खास उपक्रम असेल, अस आयोजकांनी बुधवारी (ता. २९) सांगितले.

न्यूयॉर्क - अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची चर्चा अमेरिकेतही आहे. याच दिवशी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथील भव्य फलकावर श्रीरामाचे छायाचित्र आणि अयोध्येतील राम मंदिराची त्रिमितीय प्रतिकृती झळकणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक घटनेच्या सन्मानार्थ हा खास उपक्रम असेल, अस आयोजकांनी बुधवारी (ता. २९) सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकन भारत सार्वजनिक व्यवहार समितीचे अध्यक्ष जगदीश सेहवानी म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये पाच ऑगस्टला होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची तयार झाली आहे. यासाठी खास भव्य ‘नॅस्डॅक’ पडदा आणि १७ हजार चौरस फूट एलईडी पडदा उभारण्यात येणार आहे. टाईम्स स्क्वेअरमधील हा फलक जगातील उच्च दर्जाचा मानला जातो.

कोरोनाबाबत WHO चे मोठं वक्तव्य; म्हणाले...

सकाळी ८ पासून ‘जय श्रीराम’
टाईम स्क्वेअर येथे ५ ऑगस्टला सकाळी ८ पासून रात्री दहापर्यंत हिंदी आणि इंग्रजीत ‘जय श्रीराम’ या शब्दांसह श्रीरामाचे छायाचित्र आणि व्हिडिओ चित्रफित, राम मंदिराची नियोजित वास्तू आणि त्रिमितीय छायाचित्रे झळकणार आहेत. तसेच भूमिपूजन कार्यक्रमाची छायाचित्रेही अन्य फलकांवर दाखविली जाणार आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: image of Shri Rama will be displayed on Times Square