IMF : भारतीय अर्थव्यवस्था मंदावणार; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला अंदाज
IMF 2025 economic forecast predicts slower growth for Indian economy : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग संथ राहण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार, या वर्षी अमेरिका व इतर व्यापार धोरणांच्या अनुषंगाने जागतिक स्तरावर अनिश्चितता संभवते.
वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर आर्थिकवाढ स्थिर असूनही २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग संथ राहण्याचा अंदाज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी व्यक्त केले.