निधीची माहिती इम्रान खान यांच्या ‘तेहरीके’ने लपविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IMRAN KHAN
निधीची माहिती इम्रान खान यांच्या ‘तेहरीके’ने लपविली | Imran Khan

निधीची माहिती इम्रान खान यांच्या ‘तेहरीके’ने लपविली

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ (PTI) या पक्षाने त्यांना परदेशातील व्यक्ती आणि संस्थांकडून मिळालेल्या निधीबाबतची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली, असा आरोप येथील माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्याच (Election Commission) एका अहवालात ही माहिती असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. इम्रान यांच्या पक्षाने अनेक बॅंक खात्यांची माहितीही लपवून ठेवल्याचा दावा माध्यमांनी (Media) केला आहे.

निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, इम्रान यांच्या पक्षाने २००९ ते २०१३ या चार वर्षांच्या कालावधीत ३१ कोटी २० लाख रुपयांच्या निधीबाबत माहिती दिलेली नाही. यापैकी १४ कोटी ५० लाख रुपये केवळ २०१२-१३ या कालावधीतीलच आहेत. ‘पीटीआय’ला २००८ ते २०१३ या कालावधीत एक अब्ज ३३ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

हेही वाचा: भुईबावड्यात तीन मंदिरे फोडली; घंटासह हजारोंच्या वस्तू लंपास

प्रत्यक्षात मात्र त्यांना एक अब्ज ६४ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, असे अहवालात म्हटले आहे. या पक्षाची एकूण २६ बँक खाती आहेत. या पक्षाला पाकिस्तानमधील १,४१४ कंपन्यांनी, ४७ विदेशी कंपन्यांनी आणि ११९ अद्याप स्थापन होणार असलेल्या कंपन्यांनी निधी दिला होता.

परदेशातून निधी

इम्रान यांच्या पक्षाला अमेरिका, दुबई, ब्रिटन, डेन्मार्क, जपान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांतून निधी मिळाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. बेहिशेबी निधीबद्दल चौकशी समितीने इम्रान यांच्या पक्षाला प्रश्‍नावली पाठविली होती. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आयोगाने म्हटले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsimran khan
loading image
go to top