चीन-नेपाळ मुद्द्यावरुन इम्रान खान यांची मोदी सरकारवर आगपाखड

वृत्तसंस्था
Wednesday, 27 May 2020

संपूर्ण जग कोरोना विरुद्धच्या लढाईत संपूर्ण ताकद लावून लढत आहे.मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील परिस्थितीकडे लक्ष देण्याऐवजी भारताविरुद्ध आगपाखड केली आहे.

संपूर्ण जग कोरोना विरुद्धच्या लढाईत आपली संपूर्ण ताकद लावून लढत आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील परिस्थितीकडे लक्ष देण्याऐवजी भारताविरुद्ध आगपाखड केली आहे. इम्रान खान यांनी चीन आणि नेपाळ सोबत सुरु असलेल्या सीमावादाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. तसेच भारतात नाझी राजवट सुरु असल्याचं ते म्हणाले आहे. इम्रान खान यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदुत्ववादी मोदी सरकारची गर्विष्ठ विस्तारवादी भूमिका नाझी विचार धारेप्रमाणे आहे. भारताची ही भूमिका शेजारी राष्टांसाठी धोक्याची बनत आहे. नागरिकत्व कायद्य़ाने बांगलादेश, सीमावादाने नेपाल-चीन आणि पाकिस्तानला पोकळ युद्धाची धमकी देऊन भारत आपला गर्विष्ठपणा दाखवत आहे, असं इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. नाझी विचाराचे मोदी सरकार अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा देत आहे. तसेच भारताची विस्तारवादी भूमिका जागतिक शांततेसाठी धोक्याची आहे, असंही इम्रान म्हणाले आहेत.

हेही वाचा : कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात​

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानमध्ये 60 हजारांपेक्षाही अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच देशात कोरोनामुळे 1,225 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीमुळे पाकिस्तानची परिस्थिती गंभीर असताना इम्रान खान यांनी देशाकडे लक्ष देण्याऐवजी भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानी जनतेचे कोरोना महामारीच्या संकटावरुन लक्ष हटावे यासाठी इम्रान खान ही खेळी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: imran khan criticize modi government on china-nepal issue