दहशतवादाबाबत इम्रान खानकडून कबुली; दिले 'या' संघटनांना प्रशिक्षण

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

इम्रान खान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर) कार्यक्रमात बोलताना त्यांना ओसामा बिन लादेनच्या प्रश्नावर उत्तर देताना ही कबुली दिली. ओसामा बिन लादेन याच्या अल् कायदा संघटनेने अमेरिकेत 9/11 सारखा भयानक दहशतवादी हल्ला केला होता. 

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर दहशतवादावर कबुली देत पाकिस्तान लष्कर आणि गुप्तहेर संघटना 'आयएसआय'ने अल् कायदासह अन्य दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण दिल्याचे म्हटले आहे.

इम्रान खान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर) कार्यक्रमात बोलताना त्यांना ओसामा बिन लादेनच्या प्रश्नावर उत्तर देताना ही कबुली दिली. ओसामा बिन लादेन याच्या अल् कायदा संघटनेने अमेरिकेत 9/11 सारखा भयानक दहशतवादी हल्ला केला होता. 

इम्रान खान म्हणाले, की 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता. त्यापूर्वी अल् कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने प्रशिक्षण दिले होते. या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकिस्तान लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये यामुळे संबंध होते. मात्र, पाकिस्तानी सरकारने 9/11 सारख्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर अशा दहशतवादी संघटनांबाबत आपली रणनीती बदलली. लादेन पाकिस्तानात कुठे वास्तव्यात होता हे आम्हाला माहिती नव्हते. त्यामुले अमेरिकेने थेट कारवाई केली. पाकमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयने सीआयएला माहिती दिली होती. त्याच माहितीच्या आधारे अमेरिकेने त्याला शोधून मारलं.

अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री जेम्स मेट्टिस हे कशामुळे पाकिस्तानला कट्टरपंथी देश समजतात, हे मला माहिती नाही, असे इम्रान खान म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan on Pakistan army 9/11 attacks al qaeda terrorist