5 काय 500 राफेल आणले तरी फरक पडत नाही; पाकिस्तानची पोकळ धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 14 August 2020

पाकिस्तानच्या निर्मितीदिवशी पाकिस्तानी लष्कराने भारताला पोकळ धमकी दिली आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या निर्मितीदिवशी पाकिस्तानी लष्कराने भारताला पोकळ धमकी दिली आहे. भारत 5 राफेल विमाने खरेदी करु किंवा 500 आम्हाला फरक पडत नाही. आम्ही भारताला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटलं आहे. भारताने फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. पण, भारतीय सैन्याच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. भारताच्या s-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम विरोधात लढण्यासाठीही पाकिस्तानी सैन्य तयार असल्याचं बाबर म्हणाले आहेत.  

उप-राष्ट्रपती पदाची उमेदवारी महिलेला मिळाल्याने पुरुषांचा अपमान- डोनाल्ड ट्रम्प 

भारताने फ्रान्सकडून 5 राफेल लढाऊ विमाने आणल्यानंतर ज्याप्रकारे त्याचे प्रदर्शन केले, त्यावरुन भारत किती असुरक्षित वाटून घेतोय हे स्पष्ट होत आहे. तरीही ते 5 राफेल विमाने खरेदी करो किंवा 500, आम्ही सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहोत. आमची तयारी पूर्ण असून आम्हाला आमच्या क्षमतेबाबत पूर्ण विश्वास आहे. आम्ही याआधी आमची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे राफेल लढाऊ विमाने  भारताकडे आल्याने काहीही विशेष फरक पडणार नाही, असं बाबर म्हणाले. 

भारताचे संरक्षण बजेट पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. मात्र, आम्हीही काही कमी नाही. या भागात संतुलन ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष दिले पाहिजे, असंही बाबर म्हणाले आहेत. भारताच्या वाढत्या संरक्षण बजेटवर बाबर यांनी टीका केली आहे. तसेच पाकिस्तानचे  संरक्षण बजेट कमी होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. यामुळे या प्रदेशातील संतुलन बिघडत असून आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, असं पाकिस्तान म्हणाला आहे.

भारत राफेल किंवा s-400 मिसाईल डिफेंस सिस्टम आणत असला तर आणू द्या. आमची तयारी पूर्ण आहे, आमच्याकडे प्रत्यक्ष गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. भारत जम्मू-काश्मीरमध्ये जनसंख्यामध्ये बदल करु पाहात असल्याचा आरोप बाबर यांनी केला. राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाल्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.  

आनंदाची बातमी; भारताच्या कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वी; कोणतेही दुष्परिणाम...

दरम्यान, राफेल विमाने भारताच्या ताफ्यात सामिल झाल्याने भारताची ताकद अधिक वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरल्याचं दिसत आहे. पाकिस्तानकडे सध्या अमेरिकेचे एफ-16 लढाऊ विमाने आहेत. पाकिस्तानची ही विमाने दुसऱ्या पिढीतील आहेत, तर भारताचे राफेल 2.5 पिढीतील आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या एफ-16 समोर राफेल विमाने कधीही सरस ठरणार आहेत. राफेल विमाने युद्धात गेमचेंजर ठरु शकतात. त्यामुळे पाकिस्तानी हवाईदलावर दबाव वाढला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: imran khan pakistan criticize india on rafale fighter