महाभियोग सुनावणी : ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

सत्तेचा दुरूपयोग केल्याचा प्राथमिक आरोप त्यांच्यावर होता. तर दुसरा आरोप हा महाभियोगावर सुनावणी होत असताना संसदेच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणल्याचा होता. हे सर्व आरोप विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाकडून करण्यात आले होते.

वॉशिंग्टन : अमेरिकी सिनेटमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या सुनावणीनंतर सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. बुधवारी (ता. ६) सिनेटने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला व ट्रम्प यांना सर्व आरोंपातून मुक्त केले आहे. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा प्राथमिक आरोप त्यांच्यावर होता. तर दुसरा आरोप हा महाभियोगावर सुनावणी होत असताना संसदेच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणल्याचा होता. हे सर्व आरोप विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाकडून करण्यात आले होते. या सर्व आरोपांतून ट्रम्प यांची मुक्तता झाली असून, महाभियोग कारवाई संपुष्टात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुनावणी वेळी साक्षीदारांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार वादविवाद झाले होते. प्रतिनिधिगृहाने मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाच्या सुनावणीला सिनेटमध्ये सुरुवात झाली. सिनेटमध्ये सत्ताधाऱ्यांचे 228 सदस्य असून, विरोधी पक्षांचे 193 सदस्य आहेत. सिनेटमध्ये सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत असल्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधातील महोभियोगाचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्‍यता कमी असल्याचे मानले जात होते. रिपब्लिकन पक्षाने महाभियोगाच्या सुनावणीवेळी ट्रम्प यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी सात सदस्यांची नियुक्ती केली होती. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप ट्रम्प यांच्याविरोधात ठेवत डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. 

रनवेवरून विमान घसरले अन् झाले तीन तुकडे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची कारवाई ही अमेरिकी संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिनेटमध्ये सुरू होती. तत्पूर्वी ही सगळी प्रक्रिया संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये सुरू होती. याबाबत अमेरिकेच्या संसदेमध्ये मतदानही घेण्यात आले. ही सगळी प्रक्रिया वरिष्ठ सभागृहामध्ये चालावी या बाजूने 228 संसद सदस्यांनी मतदान केले, तर 193 सदस्यांनी याला विरोध केला होता. 

सध्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्यावर अधिकारांच्या गैरवापराबरोबरच अमेरिकी कॉंग्रेसच्याविरोधात कट केल्याचा ठपका ठेवला होता. "ही अत्यंत वाईट आणि दुर्दैवी बाब आहे, आमच्या अध्यक्षांनी देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणारी कृत्ये केली आहेत. असे करूनच त्यांनी शपथेचाही भंग केला आहे, तसेच देशाच्या निवडणुकीची सुरक्षादेखील धोक्‍यात आणली आहे,'' अशी खंत पेलोसी यांनी व्यक्त केली. हा ठराव मंजूर झाल्यानंतर पेलोसी यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी सदस्यांना खास पेनांचेही वाटप केले होते. तसेच सिनेटच्या चेंबरमध्येच ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे सर्व सदस्यांसमोर मोठ्याने वाचन करण्यात आले होते. 

राममंदिरासाठी ट्रस्ट; पंतप्रधान मोदींची संसदेत घोषणा 

सरन्यायाधीश सहभागी 
ट्रम्प यांच्यावरील पहिला आरोप हा सत्तेच्या दुरुपयोगाचा असून दुसरा महाभियोगावर सुनावणी होत असताना संसदेच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणल्याचा होता. सिनेटमधील महाभियोगावरील सुनावणीत सरन्यायाधीश जॉन रॉबर्टसदेखील सहभागी झाले होते, त्यामुळे सभागृहाला न्यायालयाचे रूप आले होते. अमेरिकेच्या इतिहासामध्ये असे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारपर्यंत सिनेटमधील महाभियोगाची कारवाई सुरू होईल, असे सिनेटमधील सत्ताधारी पक्षाचे नेते मिच मॅक्कोनेल यांनी सांगितले. पेलोसी यांनी या सगळ्या कारवाईमध्ये ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि अध्यक्षांचे निकटवर्तीय यांची चौकशी केली जावी अशी मागणी केली होती. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी मात्र आम्ही केवळ पुरावेच गृहीत धरू असे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: American Senate acquitted President Trump of both articles of impeachment