Pakistan: भारत इतकाच आवडत असेल तर पाकिस्तान सोडा; इम्रान खानवर टीका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल भारतातील लोकांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं.
Imran Khan- Maryam Nawaz
Imran Khan- Maryam Nawaz

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल भारतातील लोकांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यानंतर पाकिस्तानातून त्यांच्या या वक्तव्याला विरोध करण्यात आला होता. माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांची मुलगी मरियम नवाज हीने त्यांच्या या वक्तव्यावर टीका करत भारतात जाण्याचा सल्ला दिला आहे. तीने इम्रान खान यांना "जर तुम्हाला भारत इतकाच आवडत असेल तर पाकिस्तान सोडा आणि भारतात जा." असा सल्ला दिलाय.

'पाकिस्तान मुस्लिम लीग - नवाझ'च्या नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी सध्याचे पाकिस्तानातीचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी हा व्यक्ती वेडा झाला असल्याचं म्हणत याला कुणीतरी समजवा की त्याच्या पार्टीतील लोकं त्याला सोडून जात आहेत. अशी खोटक टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात भारताचे कौतुक केलं होतं. भारतीय हे 'खुद्दार कौम' (अतिशय स्वाभिमानी लोकं) आहेत पण फक्त आरएसएसच्या विचारसरणीमुळे आणि सध्या चालू असलेल्या काश्मीर प्रश्नामुळे आमचे संबंध चांगले नाहीत. असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. याबरोबर त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरण आणि इतर बऱ्याच बाबींवर भाष्य केलं होतं.

Imran Khan- Maryam Nawaz
माझी हत्या होऊ शकते; ताब्यात घेतल्यावर सदावर्तेंचं मोठं विधान

दरम्यान यावर मरियम यांनी आपल्या ट्वीटरवरुन ट्वीट करत म्हटलंय की, जे भारताची स्तुती करतात त्यांना माहीती पाहिजे की भारताच्या २७ पंतप्रधानांविरुद्ध अविश्वासाचे प्रस्ताव आले होते परंतु कुणीही कायदा हातात घेतला नाही. अटल बिहारींचा एका मताने पराभव झाला पण त्यांनी तुमच्यासारखं लोकांना ओलीस ठेवलं नाही. असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. दरम्यान पाकिस्तानात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असून इम्रान खान सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदासाठी उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान सत्ता परिवर्तन झाल्यावर नवाज शरिफ यांना भारतात आणलं जाणार असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि मुस्लिम लीगचे सर्वौच्च नेते नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावल्यावर त्यांना शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर ते उपचाराच्या नावाखाली तीन वर्षापासून ब्रिटनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com