अमेरिकेची प्रवेशबंदी पाकिस्तानसाठी इष्टापत्ती

पीटीआय
मंगळवार, 31 जानेवारी 2017

इम्रान खान ः देशाचा विकास करण्याची संधी

लाहोर- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानवर व्हिसाबाबत निर्बंध घालतील, अशी आशा आपल्याला वाटत असल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू व राजकीय नेते इम्रान खान यांनी सोमवारी सांगितले. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशाचा विकास करण्यासाठी मदतच होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

इम्रान खान ः देशाचा विकास करण्याची संधी

लाहोर- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानवर व्हिसाबाबत निर्बंध घालतील, अशी आशा आपल्याला वाटत असल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू व राजकीय नेते इम्रान खान यांनी सोमवारी सांगितले. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशाचा विकास करण्यासाठी मदतच होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

ट्रम्प यांनी मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत "प्रवेश बंदी'चा आदेश दोन दिवसांपूर्वी काढला होता. काही निवडक देशांना हा आदेश असल्याचे सांगण्यात आले. यानुसार पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या अमेरिकेच्या व्हिसावर निर्बंध येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही समस्या नसून पाकिस्तानसाठी इष्टापत्तीच ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पाकिस्तानला व्हिसा देणे, ट्रम्प प्रशासनाने थांबविण्याची प्रार्थना मी करतो. यामुळे आम्हाला आमच्या देशाचा विकास करण्याची संधी मिळेल, असे सांगून आम्ही ट्रम्प यांना इराणप्रमाणे उत्तर देऊ आणि अमेरिकेच्या नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवेश नाकारू, असा इशारा त्यांनी दिला.
इम्रान खान यांनी "पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ' या आपल्या पक्षाचा मेळावा साहिवाल येथे आयोजित केला होता. पंतप्रधान नवाज शरीफ वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जातात, याचा उल्लेख करीत इम्रान खान यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ""आमचे पंतप्रधान डोकेदुखीसाठीही परदेशात धाव घेतात. जर अमेरिकेने निर्बंध घातले तर नवाज शरीफ पाकिस्तानच्या विकासाकडे लक्ष देतील. भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी ते आपल्या मुलांचा उपयोग करून घेत आहेत, अशी टीकाही खान यांनी केली. शरीफ कुटुंबाने केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देऊ, अशी प्रतिज्ञा खान यांनी केली.

"युद्धाची भाषा नको'
भारत -पाकिस्तान संबंधांबद्दल इम्रान खान म्हणाले की, प्रत्येक पाकिस्तानी नागरिक नवाज शरीफ यांच्यासारखा पळपुटा नाही, याची आठवण मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून देऊ इच्छितो. आमचा देश शांतताप्रिय आहे. पाकिस्तानबरोबर युद्ध नको, अशीच इच्छा बहुसंख्य भारतीय नागरिकांची आहे.

Web Title: Imran Khan thinks Donald Trump should include Pakistan on ...