Coronavirus : पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही

वृत्तसंस्था
Tuesday, 28 April 2020

कोरोनाच्या संकटात पाकिस्तानला अजून कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच याला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसोबत बातचित केली. पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून एक रुपयाचीही मदत झालेली नसल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

इस्लामाबाद : कोरोनाच्या संकटात पाकिस्तानला अजून कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच याला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसोबत बातचित केली. पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून एक रुपयाचीही मदत झालेली नसल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेविषयीही चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागला आहे. कोणताही देश किंवा जागतिक संघटनेने पाकिस्तानला कुठलीही मदत केलेली नाही. पण आयएमएफने कर्ज फेडण्यासाठी दिलासा दिला आहे, असे इम्रान खान यांनी सांगितलं आहे. इम्रान खान म्हणाले 'कोरोनानंतरची स्थिती संपूर्ण जग आणि पाकिस्तानसाठी परीक्षा असेल. युरोप आणि अमेरिकेपेक्षा पाकिस्तानची स्थिती वेगळी आहे. लॉकडाऊनचा दुष्परिणाम पाकिस्तानवर झाला आहे. मला लॉकडाऊन लागू करायचा नव्हता, कारण मजूर आणि रोजंदारीवर कमावणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. पाकिस्तानमध्ये ७५ टक्के मजूर नोदंणीकृत नाहीत.'

कोरोनाला हरवून जॉन्सन पुन्हा कार्यालयात हजर

इम्रान खान यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. अनेक लोकं सोशल मीडियावर खोटा प्रचार करत आहेत. 'ज्यांनी भ्रष्टाचाराने पैसे कमावले आहेत, त्यांना मीडियाची भीती वाटत आहे, कारण, आपला बिंग फुटेल. आयएसआयने ट्रॅक ऍण्ड ट्रेस सिस्टिम सुरू केली आहे. यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट शोधायला मदत होईल,' असेही इम्रान खान यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khans pain over corona says No one helped even a dollar