मलेशियात दोन ट्रेनची समोरासमोर धडक; २१३ जण जखमी

ट्रेनचे ब्रेक निकामी झाले होते की अजून काही कारण आहे यादृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.
Accident
AccidentGoogle file photo
Summary

ट्रेनचे ब्रेक निकामी झाले होते की अजून काही कारण आहे यादृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.

क्वालालंपूर : मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालालंपूरमध्ये (Kuala Lumpur) एलआरटी ट्रेनमध्ये (LRT) झालेल्या एका अपघातात २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी (ता.२४) सायंकाळी ही घटना घडली. प्रवाशांना घेऊन निघालेली एक एलआरटी ट्रेन दुसऱ्या रिकाम्या एलआरटी ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मंत्री अन्नुअर मुसा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. या घटनेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. (In Malaysian capital Kuala Lumpur train crash injures more than 200 people)

Accident
बेलारुस : राष्ट्रपतींकडून विमान हायजॅक; पत्रकाराला केली अटक

प्रवाशांनी भरलेली ट्रेन अम्पांग स्टेशनहून निघाली होती. केएलसीसी बिल्डिंगच्या खाली ही घटना घडली. या घटनेत कुणी मृत पावल्याची बातमी समोर आली नाही, पण २१३ नागरिक जखमी झाले आहेत. ६४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर ३ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

ऑपरेशन सेंटरमध्ये झालेल्या विसंवादामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डांग वांगी ओसीपीडीचे सहाय्यक आयुक्त मोहम्मद जैनल अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या संख्येत लोक जखमी झाले. त्यामुळे ट्रेनचे ब्रेक निकामी झाले होते की अजून काही कारण आहे, यादृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.

Accident
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा रूग्णाला बसला मोठा फटका

टास्क फोर्सची स्थापना

परिवहन मंत्री वी का सियोंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'एलआरटीच्या गेल्या २३ वर्षांच्या इतिहासात ही पहिली दुर्घटना आहे. या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एका टास्क फोर्स आणि समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक परिवहन विभागाचे संचालक प्राथमिक अहवाल सादर करतील, त्यानंतर दोन आठवड्याच्या कालावधीत टास्क फोर्स अपघाताचे नेमके कारण काय आहे, याविषयीचा अहवाल सादर करेल.'

मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासीन यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. परिवहन मंत्रालय आणि रेल्वे कंपनीला दुर्घटना का झाली याचा तपास करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे. जखमी नागरिकांवर आवश्यक ते सर्व उपचार करण्यात यावेत, असेही पंतप्रधान यासीन यांनी म्हटले आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com