Singapore Covid 19 Wave: सिंगापूरमध्ये हाहाकार! एकाच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे

Corona: आपण कोरोना लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत आणि ती सतत वाढत आहे. त्यामुळे, येत्या दोन ते चार आठवड्यांत म्हणजे जूनच्या मध्यापासून आणि उत्तरार्धात लाट शिगेला पोहोचेल.
Singapore Covid 19 Wave
Singapore Covid 19 WaveEsakal

सिंगापूरला COVID-19 च्या नव्या लाटेचा सामना करावा लागत आहे, कारण 5 ते 11 मे पर्यंत तेथे सक्रिय रुग्णांची 25,900 हून अधिक प्रकरणे नोंदवली आहेत. रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना, आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी पुन्हा मास्क सक्ती लागू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तेथे प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या (MOH) मते, एका आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 25,900 वर पोहचली आहे. मागील आठवड्यात हीच संख्या 13,700 इतकी होती.

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने अहवालात असे नमूद केले आहे की, सरासरी COVID-19 हॉस्पिटलायझेशन दर आठवड्याच्या आधीच्या 181 वरून सुमारे 250 पर्यंत वाढला आहे.

त्यांनी सांगितले की, आपण कोरोना लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत आणि ती सतत वाढत आहे. त्यामुळे, येत्या दोन ते चार आठवड्यांत म्हणजे जूनच्या मध्यापासून आणि उत्तरार्धात लाट शिगेला पोहोचेल.

Singapore Covid 19 Wave
John Kirby : भारतातील लोकशाही सर्वांत चैतन्यशील

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सार्वजनिक रुग्णालयांना किरकोळ रुग्णांना रुग्णालयातील खाटांची क्षमता पाहता घरी हलवण्यास सांगितले आहे.

याव्यतिरिक्त, वैद्यकीयदृष्ट्या कमी गंभीर रूग्णांचे हॉस्पिटलच्या वॉर्डऐवजी स्वतःच्या घरीच उपचार करावे असा सल्ला देण्यात आला आहे.

ओंग यांनी गंभीर आजाराचा धोका असलेल्या लोकांना COVID-19 लसीचा अतिरिक्त डोस घेण्यास सांगितले आहे.

Singapore Covid 19 Wave
Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

सिंगापूरचे आरोग्य मंत्री ओंग म्हणाले की, कोरोना प्रकरणांची संख्या एकदा दुप्पट झाली तरीही, सिंगापूरची आरोग्य सेवा व्यवस्था 500 रुग्ण हाताळू शकते. ते म्हणाले की, जर रुग्णांची संख्या दुप्पट झाली तर 1,000 रुग्ण असतील आणि त्यामुळे रुग्णालयाच्या यंत्रणेवर त्याचा मोठा भार पडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com