Singapore Air Forceच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून... वाचा या प्रकरणातील भारतीय कनेक्शन

Phishing: इश्वरन महिलांना भीती दाखवायचा की, त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर तो महिलांना मदत करतो म्हणायचा आणि फिशिंक लिंक पाठवायचा.
Singapore Air Force Worker Phishing Case
Singapore Air Force Worker Phishing CaseEsakal

सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या 26 वर्षीय तरुणाला आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मिळविण्यासाठी महिलांची सोशल मीडिया अकाउंट्स हॅक केल्याबद्दल 11 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हा तरुण सिंगापूर एअर फोर्समध्ये इंजिनीअर म्हणून नोकरीला होता. के ईश्वरन नावाच्या या व्यक्तीला कंप्यूटर मिसयूज गैरवापर कायद्यांतर्गत 10 आरोपांसाठी दोषी ठरवले.

न्यूज एशिया वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या तरुणाला शिक्षा व्हावी यासाठी इतर 21 आरोपांचाही विचार न्यायालयाकडून करण्यात आला. (Singapore Air Force Worker Phishing Case)

इश्वरनने 22 महिलांना 2019 ते 2023 या कालावधीत सोशल मीडिया, क्लाउड सर्व्हर आणि ईमेल अकाउंट्सचे लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवण्यासाठी फिशिंग लिंक पाठवल्या, असे फिर्यादींनी सांगितले.

इश्वरनने फिशिंग लिंक पाठलेल्या महिलांमध्ये तो ज्यांना प्रत्यक्षात ओळखत होता त्याच महिलांचा समावेश होता. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणातील महिलांची ओळख गुप्त ठेवली आहे.

दरम्यान इश्वरन महिलांना भीती दाखवायचा की, त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर तो महिलांना मदत करतो म्हणायचा आणि फिशिंक लिंक पाठवायचा.

Singapore Air Force Worker Phishing Case
Mumbai Police: मुंबईत स्पेशल 26! पोलीस असल्याचा बनाव करत कॅफे मालकाच्या घरात घुसले अन् 25 लाख लुटले

दरम्यान या प्रकरणात एक पीडित मॉडेल होती. ईश्वरनला माहित होते की, तिने मॉडेलिंग शूट केले आहे. त्यामध्ये तिने मॉडेलने अर्धवट कपडे घातले होते. त्यामुळे त्याला तिचे फोटो हवे होते.

एवढेच नाही तर ईश्वरनने अनेक पुरुषांचे सोशल मीडिया अकाउंट्सही हॅक केले होते. यानंतर तो त्या पुरुषांच्या अकाउंटवरून महिलांशी बोलत असे. व आक्षेपार्ह छायाचित्रे मागवत असे.

Singapore Air Force Worker Phishing Case
Viral Video: 'भारत चंद्रावर पोहोचला अन् आमची मुले गटारात...', पाकिस्तानी खासदाराने आपल्याच सरकारला धुतले; पाहा व्हिडिओ

ईश्वरशी संबंध असलेल्या फिशिंग प्रकरणाचा तपास आधीच सुरू होता. 2023 मध्ये जामिनावर बाहेर असतानाही तो अशी कृत्ये करत होता. जानेवारी 2023 मध्ये, त्याने 20 वर्षीय तरुणीचे इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट खाते हॅक केले. यानंतर त्याला तरुणीचे आक्षेपार्ह फोटो सापडले. यानंतर, तिच्या इतर सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करण्यासाठी त्याने फिशिंग लिंक पाठवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com