
Independence Day: खास व्हिडिओ बनवून गुगल साजरं करत आहे भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुगल इंडियानं ट्विट केलेल्या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
प्रश्न विचारण्याची 75 वर्षं,
उपाय शोधण्याची 75 वर्षं,
उड्डाण घेण्याची 75 वर्षं,
असं कॅप्शन देत गुगल इंडियानं हा व्हिडिओ ट्विट केला आहे. गेल्या 75 वर्षांत भारताच्या काही गौरवशाली घटनांचा या व्हिडिओत मागोवा घेण्यात आला आहे.
अभिनेता फरहान अख्तरच्या आवाजात हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. ज्यात म्हटलंय,
“इतक्या वर्षांच्या अथक संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा स्वातंत्र्यानं आपल्याला विचारलं की आता काय शोधणार? तेव्हा आम्ही म्हटलं आम्हाला अशा भविष्याचा शोध घ्यायचा आहे, जे आम्ही स्वत: लिहिलेलं असेल.
जिथं स्वप्नांना कोणतीच मर्यादा असता कामा नये, कोणतंच पाऊल धीम्या गतीनं पडता कामा नये.
एक असं भविष्य हे हिरवंगार, शुभ्र असावं. ज्यात आम्हाला जगाची ओळख व्हावी आणि जगाला आमची ओळख व्हावी, जिथं देशातील नागरिकांना नवीन उड्डाणं घेता येतील, जिथं देशातील नागरिकांना नवीन उमेद मिळेल, अशा भविष्याची आम्हाला आशा आहे.
जिथं देशातील नागरिकांच्या हातात हात धरून आम्ही वेगानं पुढे जाऊ शकू.आणि सोनेरी, उज्ज्वल असा देश तयार करु.
75 वर्षं, 140 कोटी नागरिक आणि असंख्य स्वप्नं, चला भारताची कामगिरी साजरी करुया.”
हा व्हिडिओ प्ले होत असताना त्यात गांधीजींपासून ते खेळाडू नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलपर्यंतच्या भारताच्या ऐतिहासिक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: Independence Day: राष्ट्रध्वज तिरंगा; जाणून घ्या पाकिस्तानसह १५ देशांच्या राष्ट्रध्वजांची नावं
आता पाहू या व्हिडिओत दाखवलेल्या ऐतिहासिक घटना
स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक
भारताची पहिली पंचवार्षिक योजना
भारताचा पहिला संगणक
भारतातील हरितक्रांती
भारताची अंतराळ मोहीम
भारतासाठी ऑस्कर पटकावणारी पहिली व्यक्ती
1983 चा भारताचा पहिला वर्ल्ड कप
1991 मधील भारताच्या आर्थिक सुधारणा
भारतातील पोलिओ निर्मूलन
शिक्षणाचा अधिकार कायदा
भारतातील यूपीआय धोरण
चांद्रयान- 2 मोहीम
कलम – 377 बद्दलचा कोर्टाचा निकाल
देशातील पहिली ट्रान्सजेंडर महापौर
भारताची कोरोना लस
मेरी कोम, नीरज चोप्रा यांचं यश
Web Title: Independence Day Google Is Celebrating 75 Years Of Indias Independence By Making A Special Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..